अथेन्स आणि स्पार्टात चाललेल्या तीस वर्षाच्या युद्धाचा शेवट प्लेगच्या साथीमुळं झाला होता!

Maharashtra Today

एथेन्समध्ये (Athens) इसवी सनपुर्व ४२६-२७ मध्ये प्लेगच्या महामारीनं थैमान घातलं होतं. ग्रीक इतिहासकार थ्यूसीदाइदिस जेव्हा एथेन्स- स्पार्टामध्ये ३० वर्ष चाललेल्या युद्धाचा तपशील देताना त्या माहामारीचा उल्लेख न करता पुढं जाऊ शकले नाहीत. ते स्वतः या रोगाच्या विळख्यात आले होते. पण वाचले होते. या प्लेगच्या साथीनं १ लाख एथेन्सवासीयांचा बळी घेतला होता. म्हणजेच शहरातली ७५ टक्के लोकसंख्या मृत्यूमुखी पडली होती. तीस वर्षांची स्पार्टा आणि अथेन्समध्ये चाललेली लढाई निर्णायक वळणाव होती तर दुसऱ्या बाजूला अथेन्समध्ये प्लेगचा वणवा पेटला (War between Athens and Sparta ended with the plague).

अथेन्समध्ये असा दाखल झाला होता प्लेगची महामारी

आफ्रिकेच्या इथोपियामधून चोर पावलांनी ही महामारी अथेन्समध्ये दाखल झाली. याआधी तिनं इजिप्तमधून लिबिया असा प्रवास करत त्यांनी अथेन्समध्ये इसवी सन ४२६ ला दाखल झाला. या महामारीच्या तीन लाटांमध्ये अथेन्स उधवस्त झालं. अनेक इतिहासकारांनी या प्रसंगाचं लेखन करताना मृत्यू तांडव असा उल्लेख केलाय. नजर जाईल तिथं फक्त प्रेतं दिसायची असा भयान नजारा होता. चार वर्ष ही महामारी अथेन्समध्ये तग धरुन राहिली आणि अथेन्सच्या पराभवाचं कारण बनली.

प्लेगमुळं अथेन्सचा पराभव झाला. अथेन्सचा सेनानायक ‘पेराक्लीज’ या महामारीत गेला. प्लेगच्या या साथीला कारण नेमकं काय ठरलं याबद्दल मात्र ठोस पुरावे नाहीत. इतिहासाच्या पानावंर फक्त अंदाजांची तोरणं बांधायचं काम यामुळं झालंय. काही जण टाइफाइडनंतर प्लेगची साथ आली असं म्हणतात तर काही जण ब्यूबॉनिक प्लेगकडं इशारा करतात.

काही वर्षांनंतर प्राचीन केरामाइकोस स्मशानभूमिजवळ सबवे स्टेशची खुदाई सुरु असताना. अडीच हजार वर्ष जुनी कबर मिळाली. यात अडीचशेच्या आसपास सांगाडे होते. या कबरी महामारीत मरणपावलेल्या लोकांच्या होत्या हे नंतर स्पष्ट झालं. गेल्या काही दिवसांपासून इटली आणि इरानमध्य्ये उत्खनात सापडलेल्या प्राचीन शवांनी संपूर्ण जगासमोर दहशतीच वातावरण निर्माण केलंय. कोरोनाच्या प्रसार काळात सुद्धा असंच चित्र निर्माण होईल का? अशी भीती लोकांच्या मनात निर्माण होतीये. साथीच्या रोगाच्या कहराची गोष्ट ही शवं सांगतात.

महामारी वैश्विक महामारीत अशी बदलते

साथीचे रोग हे स्थानिक न राहता जगभरात पसरल्या याच प्रमुख कारण समुद्र प्रवासाला मानलं जातं. देशविदेशात प्रवास करुन बंदारवर जहाजं थांबतात आणि साथीचे रोग किनाऱ्यावर पाय ठेऊन संपूर्ण देशात हौदोस घालतात. अथेन्समध्ये प्लेगच्या साथीचा रोग पिराइस बंदरातून शहरात शिरला. इथूनच खाद्यान्न, पिण्याच पाणी आणि इतर गोष्टींचा व्यापार व्हायचा.

आधुनिक काळात हवाई मार्गांमुळं साथीचे रोग वैश्विक बनल्याचं स्पष्ट दिसतं. चिनच्या वुहानमध्ये कोरोना पहिल्यांदा आढळला आणि इटलीच्या ‘मिलान’ शहरात त्याचा प्रकोप पहायला मिळाला. याला प्रमुख कारण मिलान शहरातली फॅशन इंडस्ट्री आहे. मिलानमध्ये मोठ्याप्रमाणात चामड्यापासून कपडे, बुटं आणि इतर साधनं बनवली जातात. चीनच्या वुहान शहरातून मोठ्याप्रमाणात चमडा या शहारत आयात केला जातो. यामुळंच कोरोनानं मिलानमध्ये शिरकाव केला. इथून मग आखाती देश, अमेरिका आणि भारत व्यापत चीनच्या एका शहरातला हा साथीचा रोग वैश्विक महामारी बनला.

स्पॅनिश फ्लूनला म्हणून वैश्विक महामारी म्हणण्यात आलं

जगभरात स्पॅनिश फ्लूमुळं भारताला सर्वात मोठा झटका बसला होता. त्यावेळी दोन कोटी लोक स्पॅनिश फ्लूमुळं दगावले होते. म्हणजे ६ टक्के जनता स्पॅनिश फ्लूमुळं मरण पावली होती. जगभरात पाच कोटी लोकांना स्पॅनिश फ्लूमुळं मरणाला सामोरं जावं लागलं होतं. अमेरिकेला याचा सर्वात मोठा फटका बसला. स्पेनमध्ये या महामारीचा जन्म झाल्यामुळं त्याला स्पॅनिश फ्लू म्हणलं जातं.

१३ व्या शतकात स्पेनचा सम्राट ‘अल्फान्सो १३ वा’ महामारीचा शिकार झाला. यानंतर स्पेनमध्ये महामारी वणव्यासारखी पसरली. ‘स्पॅनिश फ्लू’ किंवा ‘स्पॅनिश लेडी’ म्हणून या साथीचा उल्लेख इतिहासात करण्यात आलाय. यानंतर फ्रान्स, इंग्लंड युरोपात पसरत आशियात ही महामारी दाखल झाली होती. साथीच्या रोगांचा इतिहास जुना आहे. त्या त्या काळात कठोर निर्णय आणि महत्त्वाचे उपाय करत यातून मार्ग काढण्यात आला. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं दहशत निर्माण केलीये. सरकार यातून कसा मार्ग काढतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button