देशात कोरोनाची तिसरी लाट येणारच, तयार राहावे लागेल; केंद्राचा राज्य सरकारांना इशारा

Coronavirus - K. VijayRaghavan

नवी दिल्ली :- कोरोनाने देशात हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी लोकांना बेडसाठी संघर्ष करावा लागत आहे. तर अनेकांचा ऑक्सिजनवाचून मृत्यू होत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, कर्नाटक, उत्तरप्रदेश आदी राज्यांना कोरोनाचा (Corona) मोठा फटका बसत आहे. यातच, आता केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांनी देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा दिला आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती आणि भविष्यातील परिस्थिती याविषयी माहिती देताना हा इशारा दिला. त्यामुळे देशातील आरोग्यव्यवस्था अजून सक्षम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन (K. VijayRaghavan) यांनी नवी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यावर भाष्य केलं आहे. “कोरोनाची तिसरी लाटही येणार, तिला कुणीही रोखू शकत नाही. मात्र, केव्हा येणार? कसा इफेक्ट करेल? हे सांगणे सध्या अवघड आहे. मात्र, यासाठी आपल्याला तयार राहावे लागले. सध्याची रुग्णवाढ आणि कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार पाहता ते होणार आहे.” असं ते म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button