कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर वाईट परिणाम नाही, नीती आयोगाचा दावा

Children - Coronavirus Third Wave - NITI Ayog

नवी दिल्ली : देशात येणाऱ्या कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेबाबत (Third Wave) चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका आहे. मात्र, त्याचा परिणाम कमी असेल, असे नीती आयोगाचे (Niti Ayog) सदस्य डॉ. व्ही. के. पॉल (Dr. V.K. Paul) यांनी म्हटले आहे.

पॉल यांनी शनिवारी सांगितलं की, जर लहान मुलांना कोरोनाची लागण झाली, तर त्यांच्यात कोणतेही लक्षणे नसतील किंवा साधारण लक्षणे असतील. साधारणपणे लहान मुलांना रुग्णालयात भरती करण्याची गरज नसेल. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू घट होत आहे. त्यामुळे ही लाट नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे, असं व्ही. के. पॉल म्हणाले.

भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार किंवा नाही यावर डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांमध्येच बरेच मतभेद सुरु आहेत. अनेक वैद्यकीय तज्ञांच्या मते कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर साधारण सप्टेंबर महिन्याच्या आसपास भारतात कोरोनाची तिसरी लाट येईल, असा अंदाज आहे. ही लाट पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत मध्यम स्वरुपाची असेल. तर कारण, कोणत्याही साथीचा प्रकोप नेमकी कधी वाढेल, हे निश्चित नसते. त्यामुळे रोगाची एखादी साथ अचानक निघूनही जाते. केवळ पीक पॉईंटच्या काळात रोगाच्या साथीचा प्रभाव प्रचंड असतो. असेही काही द्यकीय तज्ञांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button