तिसऱ्या लाटेला सामोरे जावे लागणारच; लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू बिनकामाचे; AIIMSचे प्रमुख डॉ. गुलेरिया यांचा इशारा

Dr. Randeep Guleria

नवी दिल्ली :- एम्सचे (AIIMS) डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी देशाला सावधानतेचा मोठा इशारा दिला आहे. भारताला कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेचा सामना करावाच लागणार आहे. नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊनचा (Lockdown) काहीच फायदा नाही, असे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. कोरोना महामारी अशीच वाढत राहिली आणि इम्यून एस्केप मॅकेनिझ्म विकसित करण्यात यशस्वी झाल्यास भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे, असा इशारा डॉ. गुलेरिया यांनी दिला आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी पर्याप्त कालावधीसाठी लॉकडाऊनची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या तीन गोष्टी
“रुग्णालयातील वैद्यकीय सेवेत सुधारणा घडवून आणणे, रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणणे आणि लसीकरणाची मोहीम गतीमान करणे. या तीन गोष्टींकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे. आपल्याला कोरोनाची साखळी तोडावी लागणार आहे. जवळचा संपर्क कमी झाल्यास रूग्णांची संख्या कमी होईल.” असे गुलेरिया यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button