जेईई (मेन) परिक्षेचे एप्रिलचे तिसरे सत्र पुढे ढकलले

JEE Main Exam Postponed

नवी दिल्ली :- भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (Indian Institutes Of Technology-IIT) आणि देशातील अन्य केंद्रीय  अभि़यांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी घेतल्या जाणार्‍या ‘जेईई (मेन)’ परिक्षेचे २७, २८ व ३० एप्रिल रोजी होणारे तिसरे सत्र पुढे ढकलण्यात आले आहे.

देशाच्या अनेक भागांत कोरोना (Corona) साथीचा जोर पुन्हा वाढत असल्याने परीक्षा देणार्‍या उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे या परिक्षेचे आयोजन करणार्‍या  ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (NTA) रविवारी जाहीर केले. एप्रिल सत्रातील परिक्षेच्या नव्या तारखा, उमेदवारांना किमान १५ दिवसांची पूर्वसूचना मिळेल, अशा प्रकारे नंतर जाहीर करण्यात येतील, असे या पत्रकात नमूद केले गेले.

उमेदवारांनी मिळालेल्या या जास्तीच्या वेळेत परिक्षेची अधिक चांगल्या प्रकारे तयारी करावी. सरावासाठी ते आपापल्या घरात बसून ‘एनटीए अभ्यास अ‍ॅप’वरून एखाद्या  संपूर्ण विषयाची किंवा प्रकरणनिहाय सराव परीक्षाही देऊ शकतात, असेही कळविण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी ‘एनटीए’च्या अदिकृत वेबसाइटला भेट देऊन परिक्षेसंबंधीच्या ताज्या सूचना पाहात राहावाय्ता, असा सल्लाही देण्यात आली आहे.

एरवी ही परीक्षा एकाच वेळी घेतली जाते. परंतु परीक्षा केंद्रांवरील गर्दी कमी करण्यासाठी ‘एनटीए’ने यंदा ही परीक्षा तीन सत्रांमध्ये घेण्याचे ठरले. परिक्षचे पहिले सत्र फेब्रुवारीत तर दुसरे सत्र मार्चमध्ये झाले. त्या सत्रांमध्ये अनुक्रमे ६,२०,९७८  व ५,५६,२४८ उमेदवारांनी परीक्षा दिली होती.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button