एका महिन्यात गॅस सिलिंडरच्या किमतीत तिसऱ्यांदा वाढ

LPG Cylinder

नवी दिल्ली :- पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) वाढत्या किमतीनंतर सर्वसामान्यांना पुन्हा धक्का बसला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी विनाअनुदानित १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची (LPG Cylinder) किंमत २५ रुपये प्रतिसिलिंडर वाढविली आहे. सिलिंडरचे  नवीन किंमती २५ फेब्रुवारी २०२१पासून लागू झाल्यात. दिल्लीत आता विनाअनुदानित १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत ७९४ रुपये इतकी झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये ही तिसरी वाढ आहे. ही वाढ अशा वेळी झाली आहे, जेव्हा पेट्रोल प्रतिलिटर १०० रुपयांपर्यंत पोहचले आहे. यापूर्वी ४ फेब्रुवारीला २५ रुपयांनी वाढ झाली होती, १४ फेब्रुवारीला ५० रुपयांनी वाढ झाली. आता २५ फेब्रुवारीला २५ रुपयांनी वाढ झाली आहे. एकूण या महिन्यात १०० रुपयांची वाढ झाली आहे.

विनाअनुदानित १४.२ किलो सिलिंडरची नवीन किंमत

एलपीजी गॅसच्या किमतीत वाढ झाल्यानंतर दिल्लीत विनाअनुदानित १४.२ किलो गॅस सिलिंडरची किंमत ७६९ रुपयांवर वाढून ७९४ रुपयांवर गेली. कोलकातामध्ये गॅस सिलिंडरसाठी ८२०.५० रुपये, मुंबईला ७९४ रुपये आणि चेन्नईला ७६० रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी दिल्लीत एलपीजीची किंमत ७६९ रुपये, कोलकातामध्ये ७९५.५० रुपये, मुंबईत ७६९ रुपये आणि चेन्नईमध्ये ७८५ रुपये होती.

१९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर झाले कमी

एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली असली तरी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडर्सच्या किमती खाली आल्यात. आज त्याची किंमत प्रतिसिलिंडरमध्ये पाच रुपयांनी कमी करण्यात आली. या कपातीनंतर दिल्लीतील १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १ हजार ५२३.५० रुपये प्रतिसिलिंडर होती. तसेच कोलकाता (Kolkata) येथे वाणिज्यिक सिलिंडर्सची किंमत १ हजार ५८४ रुपये, मुंबईत १ हजार ४६८ रुपये आणि चेन्नईमध्ये १ हजार ६३४. ५० रुपये होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER