ठाकरे सरकार लोकांची बत्ती गुल केल्याशिवाय राहणार नाही – किरीट सोमय्या

CM Uddhav Thackeray-Kirit Somaiya

मुंबई : आज, १२ ऑक्टोबरला मुंबईत अचानक वीज पुरवठा खंडित झाला. सुमारे २ तासांनंतर हळूहळू मुंबईत वीज पुरवठा सुरू होत गेला. यावरून विरोधी पक्षाचे नेते ठाकरे सरकारवर (Thackeray Govt) टीका करत आहेत. भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले – ठाकरे सरकार लोकांची बत्ती गुल करेल.

सोमय्या यांनी ट्विट केले – ठाकरे सरकारच्या राज्यात अंधेर. आज वीज गेली त्यासाठी पूर्णपणे ठाकरे सरकार आणि त्यांच्या वीज कंपन्या जबाबदार आहेत. सरकारकडे पैसे नसल्यामुळे आज हे ‘ग्रीड फेल्यूअर’ झाले आहे. आम्ही वीज मोफत देऊ असे सांगणारे हे सरकार लोकांची बत्ती गुल केल्याशिवाय राहाणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER