सूडबुद्धीने केलेल्या कारवाईची ‘ठाकरे’ सरकारला किंमत मोजावी लागेल; भाजप नेत्याचा इशारा

Prasad Lad - Uddhav Thackeray

मुंबई : काल सायंकाळी रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा करणाऱ्या ब्रुक कंपनीच्या मालकाला पोलिसांनी त्यांच्या घरून ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशीही केली. केलेल्या या कारवाईवरून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी जैन यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड हे पोलीस ठाण्यात पोहचले होते. यावेळी त्यांनी कारवाईवरून पोलिसांना जाब विचारला.

यानंतर लाड यांनी ट्विटरवरून ‘ठाकरे’ सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, “या तिघाडी सरकारने सर्व सीमा ओलांडल्या आहेत. स्वतः काही करायचे नाही. भाजप जनतेचा पक्ष म्हणून ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन महाराष्ट्रातील जनतेसाठी आणणार याचा राग म्हणून की काय राजकीय आकसाने आज हे कृत्य करून तुम्ही चुकलात. याची किंमत मोजावी लागणार!” असा गर्भित इशारा लाड यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google buttonPrasds