भाजपला श्रेय मिळू नये यासाठी ठाकरे सरकारने मराठा आरक्षण घालवले, दरेकरांचा आरोप

Pravin Darekar - CM Uddhav Thackeray

नवी मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर सध्या राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपचे नेते आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) टिकवण्यासाठी ठाकरे सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यात कमी पडले, त्यामुळेच मराठा आरक्षण रद्द झाल्याचा आरोप भाजप नेते सातत्याने करत आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे.

तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाच्या हितासाठी आरक्षण लागू केले. मात्र कुठेतरी राजकीयदृष्ट्या मराठा समाज भाजपच्या बाजूने वळला जाईल अशी भीती महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) वाटली. त्यातूनच चुकीच्या पद्धतीचा आरक्षणाचा प्रस्ताव ठेवला असल्याचे सांगत हे आरक्षण रद्द करण्यास ठाकरे सरकारने भाग पाडले, असा गंभीर आरोप दरेकर यांनी केला. आता मराठा समाजात सरकारविरोधात संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी (BJP) खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होणार आहे. तसेच नारायण राणे यांच्या नावावर विनायक राऊत (Vinayak Raut) दुकानदारी चालवतात, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button