ठाकरे सरकारने पंतप्रधानांचा आदर्श घेऊन गरिबांना मदत करावी; रामदास आठवलेंचे आवाहन

ramdas athavale

मुंबई :- केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस आणि पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय स्वागतार्ह आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधानांचा आदर्श घेऊन आघाडी सरकारने राज्यातील गरिबांना भरघोस मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

यापूर्वी मे-जून महिन्यात पीएम गरीब कल्याण अन्न योजनेतून अन्नधान्य गरिबांना देण्याचा निर्णय घेतला होता. आता दिवाळीपर्यंत या योजनेचा विस्तार केल्याबद्दल आम्ही पंतप्रधानांचा मनःपूर्वक अभिनंदन करतो. आघाडी सरकार केंद्रावर सतत टीका करत असतात. मात्र मोफत लस देण्याचा आणि गरिबांना अन्नधान्य वाटपाचा निर्णय पंतप्रधानांनी घेतल्यामुळे आघाडीचे तोंड बंद झाले आहे, असा टोला आठवलेंनी लगावला.

मागील वर्षाभरापासून राज्य शासनाने कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊनच्या बिकट दिवसांत गरिबांना कोणतीही आर्थिक मदत दिली नाही. राज्य सरकारने गरजूंना त्वरित आर्थिक मदत दिली पाहिजे. आघाडी सरकारने पंतप्रधान मोदींचा आदर्श घेऊन गरिबांना भरीव मदतीचे वाटप करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मोदींचे कौतुक

देशात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. महाराष्ट्राप्रमाणे अन्य राज्यात कडक निर्बंध लागले आहेत. यामुळे हातावर पोट असणाऱ्या गरिबांचा रोजगार बुडाला आहे. गरिबांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न आहे. त्यांचे हे दुःख ओळखून पंतप्रधान मोदींनी (PM Modi) गरीब कल्याण अन्नयोजनेद्वारे ८० कोटी गरिबांना दिवाळीपर्यंत प्रत्येकी ५ किलो अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचे रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button