डॅमेज कंट्रोलची गरज भाजपला नव्हे तर ठाकरे सरकारला आहे; फडणवीसांचा दावा

Uddhav Thackeray & Devendra Fadnavis

जळगाव : एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केल्यानंतर भाजपला (BJP) मोठी गळती लागली. भाजपच्या अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज जळगाव जिल्ह्याचा दौरा केला. वादळामुळे झालेल्या केळीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी फडणवीस हे जळगाव जिल्ह्याचा दौऱ्यावर होते. मात्र, यावेळी पत्रकारांनी भाजपला लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारले. डॅमेज कंट्रोलची गरज ठाकरे सरकारला आहे, भाजपला नाही, असा दावा त्यांनी केला.

भाजपच्या खासदार रक्षाताई खडसे (Raksha Khadse) यांनी मला चहाचे निमंत्रण दिले. रक्षाताई यांच्या घरी मी चहाला गेलो. यामुळे कोणीही वावगे समजण्याचे कारण नाही. जळगाव दौरा फक्त शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आहे, असे फडणवीस म्हणाले. याचबरोबर डॅमेज कंट्रोलची गरज या सरकारला आहे. ठाकरे सरकारवर लागणारे आरोप, सरकारची झालेली अवस्था आणि नुकताच लागलेला पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल, त्यामुळे या सरकारला डॅमेज कंट्रोलची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

शेतकऱ्यांना मदत द्यावी
जळगाव जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागच्या नुकसानाचे पैसे अद्यापही मिळाले नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कोकणात सरकार धावले; मात्र इथे दुर्लक्ष होत आहे. योग्य नुकसान दाखवण्यासाठी त्या लोकांकडून पैशांची मागणी होत आहे. ठाकरे सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे. शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button