ठाकरे सरकार निर्लज्ज, नुकसानग्रस्त कोकणवासीयांना वाऱ्यावर सोडले – नितेश राणे

nitesh rane on CM Uddhav Thackeray.jpg

सिंधुदुर्ग : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या नुकसानभरपाईवर ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. कोकणात झालेल्या नुकसानी भरपाई घोषित केली पण नुकसानग्रस्तांना मिळालेली रक्कम अपूर्ण असल्याची तक्रार नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे म्हणाले की, तौते चक्रीवादळाने नुकसान झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी कोकण दौरा केला परंतु सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाई “खोदा पहाड निकला चुहा” अशा प्रकारची नुकसान भरपाई आमच्या कोकणाला महाविकास आघाडी सरकारने दिलेली आहे . जिथे मच्छिमारांच लाखोंचं नुकसान झालेलं आहे, तिथे फक्त ५० हजार पर्यतची मदत केली.

हेक्टरी ५० हजार मदत देणार असल्याचे सरकारने सांगितले आहे, म्हणजे एका आंब्याच्या झाडाला ५०० रुपये तर नारळाच्या झाडाला २५० रुपये, टपरीला १० हजार रुपये, एवढे सगळे आकडे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा खर्च तरी एवढा आहे का? जी काही कोकणाला मदत केली आहे ती म्हणजे एकप्रकारची थट्टा आहे. पंचनामे कशासाठी केले आमची आमची थट्टा करण्यासाठी की मजाक उडवण्यासाठी केले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. निर्लज्जपणे केंद्राकडे दोन हजार कोटी मागायचे आणि इथे फक्त अडीच कोटी रुपये द्यायचे असं हे निर्लज्ज ठाकरे सरकार निर्लज्ज आहे. कोकणी माणसाला अक्षरशा वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button