
मुंबई : शरजील उस्मानीच्या (Sharjeel Usmani) हिंदूविरोधी वक्तव्यावरुन भाजपा (BJP) आक्रमक झाली आहे. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेचे (Shiv Sena) डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारला आहे. ठाकरे सरकारने शरजीलला पळून जाण्यात मदत केली असा आरोप शेलार यांनी केला.
एल्गार परिषदेला परवानगीच का दिली?, असा प्रश्न आशिष शेलार यांनी विचारला आहे. “शरजीलने परिषदेत केलेल्या वक्तव्यानंतर त्याला मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर का जाऊ दिले? त्याला पळून जाण्यासाठी मदत करण्याचे काम सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) केलं आहे. हे त्यांचे पाप आहे,” असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला.
“शरजीलला पळून जाण्यात मदत केल्यानंतर, भाजपाने दोन दिवस आंदोलन केल्यावर, आम्ही गुन्हा दाखल करू असे म्हणणे ही पश्चातबुद्धी आहे. शिवसेनेने हिंदूना सडलेला म्हणणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचे काम का केले हे सांगावे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला