पवारांच्या पुढाकाराने स्थापन झालेलं ठाकरे सरकार बहुजनद्वेष्ट – गोपीचंद पडळकर

Gopichand Padalkar - Sharad Pawar

मुंबई :- पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा शासन आदेशा मागे घेणे दूरच, उलट आरक्षण रहचा निर्णय अमलात आणत राज्य सरकारने तब्बल ६७ कक्ष अधिकाऱ्यांना अव्वर सचिवपदावर सेवाज्येष्ठते नुसार बढती दिली आहे. पदोन्नतीतील आरक्षण पुन्हा लागू करा आणि शासन आदेश मागे घ्या, या मागणीसाठी आधी आक्रमक आणि आता मवाळ झालेल्या काँग्रेसची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अप्रत्यक्षरीत्या फेटाळून लावली आहे. आणि याच मुद्द्यावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी महाविकास आघाडी सरकारसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला.

आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची लगबग उडालीये. ..सत्तेचे वेसन बांधलेले कॉंग्रेसचे लाचार मंत्री काका-पुतण्यापुढे फक्त माना डोलवतायेत. मी लवकरच माननीय सोनिया गांधींना (Sonia Gandhi) तुमचे मंत्री किती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांशी प्रेरित होऊन सत्तेत काम करतात. माननीय शरदचंद्र पवार यांच्या पुढाकाराने स्थापित झालेलं सरकार किती बहुजनद्वेष्ट आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यांना मराठा आरक्षणाविषयी (Maratha Reservation), ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी व पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात कुठलेही पाऊल उचलण्याची घाई नाही. पण न्यायालयाच्या निर्णयाआधीच, अशी खरमरीत टीका पडळकर यांनी केली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button