ठाकरे सरकारने सचिन वाझेला पाठीशी घातले; रामदास आठवले यांचा आरोप

Ramdas Athawale - CM Uddhav Thackeray

मुंबई :- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली. गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले. सचिन वाझे यांना ठाकरे सरकारने पाठीशी घातले, असा आरोप आरपीआयचे नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केला. एनआयए या प्रकरणाचा तपास करत असल्याने यातले सत्य बाहेर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आठवले म्हणालेत, सचिन वाझे प्रकरणात राज्य सरकारची भूमिका चुकीची आहे. या प्रकरणातील सत्य लवकरच समोर येईल. राज्य सरकार सचिन वाझे यांना पाठीशी घालत आहे, या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी सचिन वाझेला अटक करण्याची मागणी सुरुवातीपासून केली होती. असे अधिकारी मुंबई पोलिसांच्या चांगल्या प्रतिमेला बाधा ठरतात, असे रामदास आठवले म्हणाले.

‘त्या’ इनोव्हाची माहिती एनआयएच्या तपासात झाली उघड
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी आढळल्या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने केलेल्या तपासात गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली. या प्रकरणात स्कॉर्पिओ गाडीच्या मागे असणारी इनोव्हा गाडी ही क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझेची असल्याचे एनआयएच्या तपासात उघड झाले. या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने अत्यंत योग्य कारवाई केली आहे, असे रामदास आठवले म्हणालेत.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना नेत्यांना सचिन वाझेची वकिली का करावी लागते? नितेश राणे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER