‘अग्नि-5’ ची चाचणी यशस्वी

- चीन आणि पाकिस्थान माऱ्याच्या टप्पात

नवी दिल्ली : ‘अग्नि-5’ या क्षेपणास्त्राची भारताने आज सकाळी 9.50 ला (रविवार) चाचणी घेतली. ही चाचणी यशस्वी झली. ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील अब्दुल कलाम बेटाजवळ ही चाचणी घेण्यात आली.

या क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी सहाव्यांदा पूर्ण झाली आहे. यापूर्वी 18 जानेवारीमध्ये ही चाचणी घेण्यात आली.अग्नि हे भारताच्या महत्त्वाकांक्षी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमामधील अत्यंत महत्त्वाचे क्षेपणास्त्र मानले जाते. याची मारकक्षमता ५ हजार कि. मी. असल्याने चीन आणि पाकिस्थान याच्या माऱ्याच्या टप्पात आले आहेत.