सामान्य माणसाच्या शरिराला असामान्य बनवणारं तंत्रज्ञान आता वास्तव बनलंय!

Maharashtra Today

हॉलीवूडच्या (Hollywood) अनेक सिनेमांमध्ये शक्तीशाली रोबोट (Robot) दाखव ले जातात, जे माणसाहून कित्येक पटीनं ताकदवान असतात. मग ते हिरो असतील किंवा विलन असतील. त्यांचा मुकाबला करायला माणसाच्या शरिरातच काही यंत्र बसवून त्यांना सायबॉर्ग (Cyborg) बनवलं जातं. हे आपण सिनेमात पाहिलं होतं. ते आज सत्य आहे.

चित्रपटातल्या पात्रांना अधिक रोमांचक बनवण्यासाठी त्यांना मिशिनचे अंग लावून ‘सायबॉर्ग’चे रुप दिले जायचे. सायबॉर्गचं नाव ऐकताच डोक्यात एक चित्र निर्माण होतं. ‘टर्मिनेटर’चं.(Terminator) हॉलिवुडचा स्टार अभिनेता आर्नोल्डनं या सिनेमात निभावलेल्या भूमिकेमुळं तो अनेकांच्या आठवणीत कायमचा कोरला गेलाय.

आतापर्यंत सायबोर्ग काल्पनिक पात्रं होतं पण बदलत्या वेळेसोबत आणि विज्ञानाच्या प्रगतीसोबत ते वास्तव बनले आहेत. आज अनेक लोक असे भेटतात जे यंत्रांच्या सहाय्यानं रोजचं आयुष्य सुखकर बनवत आहेत.

सैनिक होता सायबॉर्ग

सायबॉर्ग म्हणजे असा मागणूस ज्याच्या शरिराचा विशेष भाग तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं नियंत्रित केला जाऊ शकतो. सायबॉर्ग हा ‘सायबरनेटीक ऑर्गेनिझम’चा शॉर्टफॉर्म आहे. ही संकल्पना पहिल्यांदा १९६० मध्ये वैज्ञानिक मॅनफ्रेड क्लाइन यांनी मांडली होती. कॉम्प्यूटर आणि मानवी मेंदू यांच्यात सामंजस्य तयार करण्याच्या प्रयत्नात ते होते. तेव्हाच त्यांनी ही संकल्पना जगासमोर मांडली. याआधी एका मासिकातून अशी संकल्पना मांडण्याचा प्रयत्न १९१७ साली झाला होता.

मासिकात प्रकाशित झालेल्या कथेत एका राजाचा उल्लेख केला होता. यात सांगण्यात आळं की एका राजानं एक सैनिक निर्माण केला होता. ज्याचं नाव होतं ‘सोल्डर २४१.’ युद्धात जखमी झालेल्या सैनिकांचे अंग वापरुन त्याला बनवण्यात आलं होतं. राजाला कोणत्याही परिस्थीतीत युद्ध जिंकायचं होतं परंतू त्याची चाल त्याच्यावरच उलटली. युद्ध जिंकण्यासाठी बनवलेल्या सोल्जर २४१नं युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न केले. त्यानं कमांडींग ऑफिसरची हत्या केली. सोल्जर २४१ लाच पहिला सायबोर्ग म्हणलं जातं.

माणसाच्या शाररिक आणि मानसिक क्षमता वाढवण्यासाठी सायबॉर्ग तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय.वैज्ञानिकांनी याच कथेचा आधार घेत यासंबंधी संशोधनाला सुरुवात केल्याचं मानलं जातं.. मानवाच्या कल्याणासाठी हे प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जातं. सामान्य माणसाला असामान्य बनवण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत.

अपंगांसाठी सायबॉर्ग ठरतायेत वरदान

आजकाल सायबॉर्ग अपंगांसाठी वरदान ठरत आहेत. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं अनेक वयोवृद्ध लोकांना रोजची दैनंदिन कामं होत नसल्यामुळं त्यांना अधिकची ताकद प्रदान केली आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर उपलब्ध आहेत.

नील हार्मसिन

नील हार्मिसन एक कलानकार आहेत. त्यांना रंग आंधलेपणाचा आजार आहे. त्यांना सर्व गोष्टी काळ्या आणि पांढऱ्या रंगातच दिसतात.त्यांच्या डोग्यावर असं यंत्र बरसवण्यात आलंय ज्याच्या मदतीनं ते संगतीच्या माध्यमातून रंग समजू शकतात.

डॉ. केविन वारविक

‘कॅप्टन सायबॉर्ग’ या नावानं डॉ. केविन वारविक प्रसिद्ध आहेत. ब्रिटनच्या सायबरनेटीक्सचे ते प्राध्यापक आहेत. १९९८ साली त्यांनी स्वतःच्या हातात मायक्रोचीप इम्पलांट केली होती. यामाध्यमातून ते संगणकाशी संबंधीत उपकरणं हाताचा रिमोट कंट्रोल प्रमाणं वापर करुन करुन करु शकतात.

सायबॉर्ग बनण्याचे धोके

तंत्रज्ञानाला नाण्याप्रमाण फायदा आणि तोटा ह्या दोन्ही बाजू असतात. सायबॉर्गच्या बाबतीतही अशीच काही परिस्थीती आहे. त्याचे फायदे जसे आहेत तसे नुकसान ही. एखादी चीप तुम्ही शरिराला लावली तर शरिराच्या संपूर्ण हलचालीचा डेटा ही चीप देऊ शकते. परंतू ही चीप खराब झाली तर ऑपरेशन करण्याशिवाय काही मार्ग उरत नाही. अनेक लोक कृत्रिम गुडघे, इत्यादी यंत्र शरिराला जोडून घेतात. परंतू यााच वाईट कामांसाठी उपयोग केला जाऊ शकण्याची भिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button