पदवीधरसह शिक्षक मतदारसंघात चुरस

Vote

पुणे : पुणे (Pune) पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची मुदत 19 जुलै रोजी संपली आहे. पुणे, सातारा (Satara), सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur) व सोलापूर (Solapur) या पाच जिल्ह्यांचा पदवीधर व शिक्षक मतदारसंघात समावेश आहे. जून महिन्यात ही निवडणूक होणार होती. परंतु,कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढल्याने पुढे ढकलल्या. आता पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. इच्छुकांकडून प्रचाराचे नियोजन गतीने सुरू झाले आहे. जिल्हावार समर्थक व संघटना पदाधिकार्यांना संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचे (BJP) वर्चस्व असून 2014 च्या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) निवडून आले. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या सारंग पाटील यांनी जोरदार लढत दिली होती. परंतु, राष्ट्रवादीचे अरुण लाड हे अपक्ष लढल्याने बंडखोरीचा फटका बसला. आ. पाटील यांनी माघार घेत पदवीधरची निवडणूक लढविणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे पदवीधरचा भाजपचा उमेदवार पुणे जिल्ह्यातून की कोल्हापुरातून मिळणार, विजयाची हॅट्ट्रिक साधणार का? याची उत्सुकता आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षही निवडणूक लढविणार असल्याने भाजपकडून कोथरूडच्या माजी आ. मेधा कुलकर्णी, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, कोल्हापुरातून माणिक पाटील-चयेकर, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसन्नजित फडणवीस यांची नावे चर्चेत आहेत. क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, पुण्याच्या नंदादीप प्रतिष्ठानच्या नीता ढमाले, राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस उमेश पाटील, मोहोळचे माजी आ. राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत.

शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष डॉ. प्रवीण कोडोलीकर, संभाजी ब्रिगेडचे मनोज गायकवाड, खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिक्षक परिषद, शाळा कृती समिती व टीडीएफ या संघटना प्रबळ मानल्या जातात. गत निवडणुकीत महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे आ. दत्तात्रय सावंत यांनी भगवानराव साळुंखे यांचा पराभव केला.

राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, कृती समितीचे बाबासाहेब पाटील, शिक्षक भारती’चे दादासाहेब लाड, शिक्षण संस्था संघाचे सचिव प्रा. जयंत आसगावकर, शिक्षक परिषदेकडून जितेंद्र पवार, पुरोगामी शिक्षक संघटनेचे जी. के. थोरात, मुख्याध्यापक संघाचे माजी राज्याध्यक्ष प्रा. सुभाष माने, प्रा. डॉ. सुभाष जाधव, प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार (कोल्हापूर), सुरेश वाघमारे (पुणे), एन. डी. बिरनाळे (सांगली) यांच्यासह डझनभर इच्छुक तयारीला लागले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER