सर्वोच्च न्यायालय म्हणाले, मराठा आरक्षण म्हणजे अल्ट्रा व्हायरस : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते

Maharashtra Today

मुंबई : राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर (Maratha Reservation)सर्वोच्च न्यायालयाने सर्वात महत्वाचा निर्णय दिला आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) रद्द केला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला चांगलाच धक्का बसला आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस. अब्दुल नाझीऱ, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठाने आज महत्वपूर्ण निकाल सुनावला आहे.

मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवगातंर्गत दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी रद्दबादल ठरवण्यात आले. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. भारतीय संविधान आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज गुणवंतांना न्याय दिला आहे, असे सदावर्ते म्हणाले.

तसेच अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाची तुलना व्हायरसशी केली. न्यायालयानेच मराठा आरक्षण हा अल्ट्रा व्हायरस असल्याचे म्हटले आहे, असे अ‍ॅड. सदावर्ते यांनी सांगितले. तसेच याप्रकरणात इंद्रा साहनी खटल्याच्या अनुषंगाने फेरविचार करण्याची गरज नाही, असेही न्यायालयाने म्हटल्याचे अ‍ॅड. सदावर्ते यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button