अभ्यासू युवा नेता आपल्यातून गेला; उद्धव ठाकरे

Rajiv Satav - CM Thackeray

मुंबई :- खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या अकाली निधनाने एक अभ्यासू युवा नेता आपल्यातून गेला, या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे कोरोनाच्या उपचारादरम्यान निधन झाले. काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला.

उद्धव ठाकरे यांनी ट्विट केले – खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाने एक अभ्यासू युवा नेता आपल्यातून गेला. आपल्या सर्वांसाठीच हा मोठा धक्का आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

– CMO Maharashtra (@CMOMaharashtra)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button