राष्ट्रवादीची ताकद वाढली, कल्याण काळे अजितदादांच्या उपस्थितीत लवकरच राष्ट्रवादी

Maharashtra Today

पंढरपूर : पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके(Bharat Balke) यांचं २८ नोव्हेंबर रोजी निधन झालं. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपचाकरेक्ट कार्यक्रम करण्याची आखणी राष्ट्रवादीने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला मोठा धक्का देणार आहे. भाजपचे कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांची ताकद वाढणार आहे.

करकल्याणराव काळे यांनी मागील लोकसभा निवडणुकीअगोदर सहकारी संस्था अडचणीत असल्याने सत्ताधारी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. काळेंचे दोन साखर कारखाने, शिक्षण संस्था, बँका, पतसंस्था असा मोठा परिवार आहे. त्यानंतर भाजपाने त्यांना अर्थसहाय्यासाठी मदत करण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. त्यानंतरच्या काळात भाजपने ते आश्वासन पाळले नाही म्हणून ते गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. त्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत भेटीगाठी समोर येत असल्याने ते राष्ट्रवादीत जाण्याची चर्चाही होती.

पोटनिवडणुकीतील उमेदवार फायनल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील संपर्क कार्यालयात त्यांच्या समर्थक, साखर कारखान्याचे संचालक, प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मते जाणून घेतली. त्यात बहूतांश कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा कौल दिल्याने पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा प्रचार करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button