आघाडी सरकारचा कोतेपणा; मेट्रो चाचणी कार्यक्रम पत्रिकेत फडणवीसांचे नाव नाही

Devendra Fadnavis - Mahavikas Aghadi - Maharashtra Today

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरात मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ उभारण्यात आली असून, भविष्यात या दोन्ही मार्गांवर धावणाऱ्या मेट्रोची चाचणी सोमवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत आकुर्ली मेट्रो स्थानकावर पार पडली. मात्र या कार्यक्रमाच्या पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नावच नसल्याने भाजपच्या नेत्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांचे नाव टाकून महाविकास आघाडी सरकारने कोतेपणा दाखवला. याबाबत प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पासाठी दिवसरात्र मेहनत घेतली. रात्रीच्या २ ते ३ दरम्यानदेखील देवेंद्र फडणवीसांनी कामाच्या ठिकाणी भेटी दिल्या.

तुम्ही श्रेय घ्या, मात्र ज्यांनी पाया रचला किंबहुना प्रकल्प पूर्णत्वास नेला त्यांना कार्यक्रमांना बोलवणं गरजेचं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधी झालेलं मी बघितलं नाही, मात्र गेल्या काही दिवसांपासून असा नवा पायंडा महाविकास आघाडीने रचला, म्हणून विरोधी पक्षाकडून दोन्ही कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्यात आला, अशी माहिती दरेकर यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button