हुसैनी ब्राम्हणांची शौर्य कथा, ब्राम्हणांनी घेतला हुसैन यांच्या शहिदीचा बदला!

Maharashtra Today

इमाम हुसैन (Imam Hussain)यांना करबलाच्या मैदानात दलजा नदीच्या किनारी क्रुर बादशाह यदीज याने घेरलं होतं. जिथं इस्लाम धर्माला निर्दयी हातात जाण्यापासून रोखण्यासाठी हुसैन यांनी अनेकांना पत्रं लिहली. यापैकी एक पत्र भारतात आलं. हे पत्र मिळाल्यानंतर माथ्याला टिळा लावून ब्राम्हणांची एक तुकडी इतिहासाच्या पानांमध्ये खास जागा मिळवण्यासाठी भारतातून निघाली करबलाच्या दिशेनं. जोपर्यंत या वीरांची तुकडी करबाल्यापर्यंत पोहचेल त्याच्या आधीच अनेक जण शहिद झाले होते. त्यांची ताकद निम्मी घटली होती तरी त्यांनी निर्धार केला होता अतोनात शौर्य दाखवण्याचा. करबालाच्या या युद्धात इमाम हुसैनच्या खांद्याला खांदा लावून लढणारे वीर होते ‘हुसैनी ब्राम्हण.’

कोण होते ते ब्राम्हण? जे इमाम हुसैनच्या मदतीसाठी जीवाची पर्वा न करता मायुभूमीपासून हजारौ मैल दुर लढायला गेले होते. याच प्रश्नांची उत्तरं शोधूयात.

पैंगबर ए इस्लामच्या नावानं प्रसिद्ध होते ‘इमाम हुसैन’

हा काळ आहे पैगंबरांच्या निर्वाणानंतरचा. त्या आधी पैंगरबर हजरत मोहम्मद यांच्यानंतर अरबी संस्कृतीनूसार ४ खलिफा म्हणजेच राष्ट्राध्यक्ष निवडले होते. ते चार खलिफा होते, अबु बकर, उमर, उस्मान आणि हजरत अली. ‘हजरत अली’ पैगंबर हजरत मोहम्मद यांचे जावई होते. पैगंबरांची कन्या फातिमा यांच्या सोबत त्यांचा विवाह झाला होता. यांच्याच पोटी जन्मले होते, ‘हजरत अली हुसैन’ नंतर हजरत अली यांची हत्या झाली. यानंतर इस्लामी जगात एक अशी वेळ आली जेव्हा इस्लाममध्ये बादशाह आणि शहनशा दिसण्यासाठी इस्लामी तत्त्वज्ञाची खुलेआम पायमलल्ली केली जात होती. बादशाह आणि शहंशहापासून इस्लाम धर्म वाचवण्यासाठी तारेवरची कसरत चालली होती.

यजीद आणि हुसैन यांच्यामध्ये झालेलं युद्ध ‘जंग-ए-करबला’

व्यसनाच्या गर्तेत हरवलेल्या यजीदनं स्वतःला इस्लाम धर्माचा शहंशाह घोषित केलं. तो इराण आणि मक्कापासून दुर असलेल्या सिरीयावर राज्य करत होता. यात ‘इमाम हुसैन’ आणि त्यांच्या अनुयायांनी हे मानण्यास नकार दिला. यजीदची कार्यपद्धती क्रुर होती. यजदीला माहिती होतं की जोवर हुसैन जिवंत असतील तोपर्यंत तो इस्लामचा बादशाह बनू शकत नाही. त्यानं यजीदला पत्र लिहून युद्धाची घोषणा केली. हुसैन त्यावेळी मक्कामध्ये होते. क्रुर शहंशाह यजीदचं युद्धाचं आव्हान त्यांनी स्वीकारलं. इराक वासीयांवर विश्वास ठेऊन ते मक्केहून निघाले. यावेळीपर्यंत इराकमध्येच यजीदच्या फौजेनं धौक्यानं हुसेन यांना गाठलं. करबलातल्या दजला नदीकाठी हुसैन यांनी त्यांचा तांडा आडवला. त्या दिवशी मुहर्रम चा दुसरा दिवस होता. पुढच्या ९ दिवसांपर्यंत जे घडलं ते इस्लामच्या इतिहासाचं सर्वात भयानक वास्तव होतं. हुसैन यांच्या मुलांना आणि पत्तींना तहानलेलं ठेवण्याचा आदेश देण्यात आला. यजीदचं पत्र मिळाल्यानंतर त्याचा सुभेदार इब्ने जियाद हुसैन आणि त्यांच्या कुटुंबार अन्याय अत्याचार करत होता.

हुसैन यांनी भारताच्या राजाला लिहलं पत्रं

इमाम हुसैन यांनी कठीण काळात मदतीसाठी पत्रं लिहली. यातलं एख खत त्यांनी लहानपणाचा दोस्त हबीब याला आणि दुसरं पत्र हजारो मैल दुर असलेल्या भारताच्या हिंदू राजासाठी लिहलं. हा राजा होता ‘राजा राहब दत्त.’ ते एक मोहयाल ब्राम्हण होते. मग काय इमाम हुसैनचं पत्र राजा राहब दत्ता यांना मिळालं त्यांनी त्यांची मोहयाल ब्राम्हणांची सेना घेऊन इमाम हुसैन यांच्या मदतीसाठी करबलाच्या दिशेने कुच केली. ते करबलाला पोहचण्याआधीच इस्लाम इतिहासातला तो काळा दिवस लिहला गेला होता.

इमाम हुसैन कुर्बान झाले

यजीदच्या लोखोंच्या सैन्यानं हुसैन, त्यांच कुटुंब आणि पुरुष साथीदारांना आणि पाहूण्यांना तडपवून तडपवून मारलं. याप्रकारे मोहमच्या दहाव्या दिवशी इमाम हुसैन शहिद झाले. यानंतर यजीद ने इमाम हुसैन यांच्या परिवाराला अटक केली. त्यांना साखळ दंडात बांधून मिरवणूक काढण्यात आली. इमाम हुसैनची मुलं, त्यांचा भाऊ अब्बास आणि इतर शहिदांचे शिर भाल्यावर अडकवून मिरवणूक काढण्यात आली. हे ऐकून राहब दत्त प्रचंद दुखी झाले. तलवार गळ्याला लावून म्हणाले, “ज्यांचा जीव वाचवण्यासाठी आपण आलो होतो तेच गेले आता जिवंत राहूनकाय करु?” इमाम हुसैन यांचे समर्थक ‘अमीर मुख्तार’ यांनी राजा राहब दत्त यांनी रोखलं. १० ऑक्टोबर ६८० या तारखेला इमाम हुसैन यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ते निघाले.

ब्राम्हणांनी घेतला हुसैन यांच्या शहिदीचा बदला

त्यावेळी यजीद यांची फौज इमाम हुसैन यांच्या शिराला घेऊन कुफामध्ये इब्ने जियाद महालाच्या दिशेने निघाली होती. राहब दत्त त्यांच्या फौजेनिशी पाठलाग करत होते. संध्याकाळ झाली होती. सेना विश्राम करत होती. राहब दत्त यांनी हिंमत दाखवली, कोणताच बाप करणार नाही ती कृती त्यांनी केली. इमाम हुसैन यांच शीर वाचवण्यासाठी स्वतःच्या मुलाचं शीर कापून त्यांच्या जागी ठेवलं. यजीदच्या फौजेने ते शीर इमान हुसैनचं असल्याचं मानायला नकार दिला, यामुळं त्यांना विश्वास पटावा म्हणून त्यांनी सातही मुलांची शीर कापून यजीदच्या सैन्याला दिलं. तितक्यात हुसैन यांच्यावर प्रेम करणाऱ्या फौजेन यजीदीच्या फौजेवर हल्ला केला. एकापाठोपाठ एक हुसैन यांच्या हत्याऱ्यांना कापून काढलं राहब दत्त यांनी जीवाची बाजी लावली.

हुसैनी ब्राम्हण अशी ओळख मिळाली.

भारताच्या वीरांना पराक्रम दाखवत इमाम हुसैन यांचा बदला घेतला. युद्ध संपलं. मोहयाली ब्राम्हण जिकंले. यानंतर तर भारतात परतण्यास निघाले. तिकडे त्यांना हिंदीया म्हणलं गेलं तर भारतात मोहयाल ब्राम्हणांना हुसैनी ब्राम्हण या नावाने ओळखलं जाऊ लागलं.

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button