निळीच्या उठावाची कहाणी, जेव्हा शेतकऱ्यांपुढं ब्रिटीशांनी टेकले होते गुडघे

The story of the blue uprising

भारतीत स्वातंत्र्य संग्रामात अनेक आंदोलनं झाली. स्वातंत्र्य लढे उभारले गेले. त्यातल एक असं आंदोलन होतं जेव्हा शेतकऱ्यांनी नांगर ठेवून उठावाचं हत्यार उपसलं, ब्रिटीशांविरोधात लढा दिला. ज्याची दखल संपूर्ण जगात घेतली गेली. ज्याल इतिहासात ‘निळीचा विद्रोह’ या नावाने ओळखले जाते. शेतकऱ्यांचा हा लढा यशस्वी झाला. संघटीत शक्तीच्या जोरावर त्यांनी इंग्रज सरकारला झुकवलं होतं.

भारतीय निळीसाठी इंग्रज अधिकाऱ्यांनी सोडल्या होत्या नोकऱ्या

इंग्रज भारतात येण्याच प्रमुख कारण होतं व्यापार वाढवणे. ही व्यापार वाढ विविध प्रकारच्या शेतीवर अवलंबून होती. नंतर इंग्रजांनी भारत ताब्यात घेतला आणि युरोपाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना मजबूर केलं. १८ व्या शतकाच्या अंतापर्यंत इंग्रजांनी भारतात अफीम आणि निळीची शेती करायला सुरुवात केली.

जस जशी निळीची मागणी भारतात वाढत गेली तसं भारतात निळीची लागवड वाढवायला इंग्रजांनी सुरुवात केली. बंगालसह बिहारात निळीची शेती वाढली. भारतात पिकलेली निळ जगभरात निर्यात होवू लागली. बंगालमध्ये पिकणाऱ्या निळीची गुणवत्ता अफाट होती. कोणत्याच देशात इतक्या उत्कृष्ठ प्रकारची निळ पिकत नव्हती.

१७८८ला इंग्रजांद्वारे युरोपात निर्यात होणाऱ्या भारतीय निळीचा टक्का फक्त ३० टक्के होता तो १८१० पर्यंत ९५ टक्के इतका वाढला. निळीच्या उत्पन्नात प्रचंड फायदा होता. हे हेरुन बऱ्याच इंग्रज अधिकाऱ्यांनी नोकरी सोडली आणि जमिनी विकत घेवून निळीची शेती करवून घेवू लागले. याला इंग्रज सरकारचीही संम्मती होती. त्यावेळी निळीची शेती करायला ज्यांच्याजवळ पैसा नव्हता त्यांना शेतीसाठी कर्ज देण्याचीही इंग्रज सरकारची तयारी होती.

निळ उत्पन्नासाठी भारतीय शेतकऱ्यांवर झाले अत्याचार

इंग्रज अधिकाऱ्यांनी कवडीमोल किंमतीत विकत घेतलेल्या निळीच्या शेतीत राबण्यासाठी शेतमजूरांची गरज होती. या मजूरांना एकत्र करुन त्यांच्याकडून निळीची शेती करवली जावू लागली. दुसऱ्या शेतकऱ्यांकडून जबरदस्ती निळ उत्पन्न घ्यायला सुरुवात केली.

याचा एक तोटा होता. निळीचं पिक घेतलं की ती जमिनीतली सारीच पोषण तत्व शोषूण घ्यायची त्यामुळं एक दोन पिकं घेतल्यानंतर जमिनी पडीक पडायला सुरवात झाली, सुपिक जमिनींना फटका बसला. नंतर अशी परिस्थीती निर्माण झाली की शेतकऱ्यांच्या वाट्याला फक्त कर्ज आली उत्पन्न इंग्रजांच्या वाट्याला. शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या बोज्याखाली दबत होती. अत्याचारान परिसीमा गाठली आता वेळ आली होती उठावाची.

विद्रोहाची ठिणगी पडली

वर्ष १८५९ बंगालच्या हजारो शेतकऱ्यांनी शेती करायला नकार दिला. या आधी स्प्टेंबर १८५८ला बंगालच्या गोविंदपूर जिल्ह्यात विद्रोहाची ठिणगी पडली. उठावाच नेतृत्तव दिगंबर विष्णू आणि विष्णू विश्वास यांनी केलं. त्यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी निळीची शेती करायला नकार दिला. १८६० पर्यंत या ठिणगीची आग बनली. बंगाल,मालद,ढाका, पावनाला या आगीनं कवेत घेतलं. बंगालमध्ये मोठा भूकंप आला.

शेतकऱ्यांनी एकजुटीनं विद्रोहाला बळ मिळालं. शेतकऱ्यांनी कर द्यायलाही नकार दिला. पुरषासह महिलांनीदेखील उडी घेतलीा. शेतमजूरांनीसुद्धा या उठावाला पाठिंबा देवून कामं थांबवली. जमिनदारांनी शेतकऱ्यांच्या उठावाला समर्थन दिलं. उठाव अधिक तीव्र झाला.

इंग्रजांनी टेकले गुडघे

निळीचा हा विद्रोह सुरुच राहिला. त्यांना विश्वास होता की ब्रिटीश सरकार शेतकऱ्यांना समोर झुकेल. कारण १८५७चा उठाव होवून फक्त एक वर्ष झालं होतं. शेतकऱ्यांच्या या उठावाचे लोन संपूर्ण भारतभर पसरेल. भारतातून पसारा आवरुन इंग्लंडला जायची वेळ येईल हे ध्यानात घेवून इंग्रजांनी माघार घेतली. इंग्रज शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळं पुरते घाबरले होते. त्यांना कोणत्याही परिस्थीतीत हा उठाव मिटवायचा होता,.

काही दिवसातच त्यांनूी फरमान काढलं, इंग्लंड राणी व्हिक्टोरीयानं निळीची शेती न करण्याचे आदेश दिले. उठाव दिवसेंदिवस उग्र होत गेला. पत्रकार, लेखकांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरली. जगभरात इंग्रजांची नाचक्की झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER