एखाद्या हॉलीवूड सिनेमासारखी आहे मुंबईच्या ‘ऑपरेशन ब्लॅक टेरिनॅडो’ची गोष्ट

Maharashtra Today

देशाच्या इतिहासातला सर्वात काळा दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर २००८. मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १६० लोकांना जीव गमवावा लागला होता. यात अनेक विदेशी नागरिकांचा सामावेश होता. मुंबईच्या ताज आणि ओबेरॉय या पंचतारांकित हॉटेल्समध्ये (In Mumbai’s Taj and Oberoi five star hotels) ते लपले होते. पाकिस्तानातून समुद्र मार्गानं आतंकवादी भारतात घुसले होते. १० आतंकवाद्यांनी देशाच्या आर्थिक राजधानीवर हल्ला केला. रात्री ९ वाजून २० मिनीटांनी प्रवाशांनी गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर (Shivaji Maharaj Terminals) त्यांनी हल्ला केला.

यानंतर लियोपोल्ड कॅफे, नरिमन हाऊस, ताज पॅलेस अँड टॉवर, ओबेरॉय ट्राइडेंट हॉटेल, कामा रुग्णालय, मेट्रो सिनेमा, टाइम्स ऑफ इंडीया बिल्डिंग आणि सेंट झेव्हियर कॉलेजवर आतंकवाद्यांनी हल्ला केला होता. कधीच न थांबणारी मुंबई आतंकवाद्यांच्या दहशतीन रोखली गेली होती.

दहशतवादी विरोधी पथकाच्या हेमंत करकरेंची हत्या

२६/११च्या त्या रात्री मुंबईचे एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांना क्राइम ब्रांचनं मुंबईवर हल्ला झाल्याचं सांगण्यात आले. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्याचे कळताच हेमंत करकरे लगेचच घरातून निघाले. अजमल कसाब आणि इस्माईल कामा रुग्णालयाबाहेर अंधाधुंद गोळीबार करत होते. या गोळीबाराची माहिती मिळताच विजय साळसकर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे तिथे पोहचले. दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंची गाडी समोरुन दिसताच त्यांनी गाडीवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात हेमंत करकरे शहीद झाले. हेमंत करकरे यांना मरणोत्तर अशोक चक्रानं सन्मानित केलं आहे.

ऑपरेशन ब्लॅक टोरेनॅडोला सुरुवात

२६ नोव्हेबंरच्याच रात्री ९ वाजून ४५ मिनीटांनी ४ आतंकवाद्यांनी लियोपोल्ड कॅफेवर हल्ला केला. यात मोठ्याप्रमाणात परदेशी नागरिक होते. यात १० लोकांचा मृत्यू झाला यानंतर बाकीच्या ४ आतकंवादी ताज हॉटेलात घुसले. तिथं आंदाधुंद गोळीबारी त्यांनी सुरु केली. दरवाजा बॉम्ब लावून उडवल्यानंतर ते ताज हॉटेलात घुसले. जवळच्याच एका पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी बॉम्ब लावून चौकी उडवली. आतंकवाद्यांनी हॉटेलात घुसताच अनेकांची हत्या केली. चार विदेशी नागरिकांना त्यांनी गोळ्यांनी ठार केलं तर सुरक्षारक्षक आणि लॅबर डॉग कुत्रा देखील या हल्ल्यात मारला गेला. अनेकांची हत्या या हल्ल्यात दहशतवाद्यांनी केली. नंतर ते १० वाजून १० मिनीटांनी ऑबेरॉय हॉटेलमध्ये घुसले.

नेव्हीच्या जवानांनी सांभाळला मोर्चा

रात्री १२ वाजता पोलिसांच्या विशेष पथकानं हॉटेलला वेढलं. मुंबई सील करण्यात आली. रात्री ३ वाजता भारतीय सैन्याचे जवान तिथं पोहचले. तिथून जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेतली. भारतीय गुप्तचर विभागानं आंतकवादी आणि त्यांच्या हेटक्वाटर्सशी होणारी बातचीत टॅप करायला सुरुवात केली. तिथं आतंवाद्यांना सांगण्यात आलं होतं की “तीन नेते आणि त्यांच्या एक सचिव या हॉटेलमध्ये आहे. यांना ताब्यात घेतलं तर भारत सरकारकडून वाटेल तीमागणी करता येईल.”

२७ नोव्हेंबरच्या सकाळी १६ मार्कोस कमांडो मुंबईत दाखल झाले. त्यांच्याकडे ए.के.४७ आणि एम. पी.५ सब मशिन गन होती सोबतच ९ एम.एम.ची पिस्तुल होती. बुलेटप्रुफ जॅकेट चढवून हे कमांडोज आकंवाद्यांच्या खात्म्यासाठी पोहचले. मार्कोसची विभागणी दोन टीममध्ये करण्यात आली. एका टीमकडे लोकांना बाहेर काढायची जबाबदारी होती तर दुसऱ्या टीमला आतंकवाद्यांचा खात्मा करायचा होता.

दिल्लीहून दुर असलेल्या मानसेर बेस वरुन एन.एस.जी. कमांडोची तुकडी दिल्लीसाठी रवाना झाली. दिल्लीहून एका विशेष विमानानं त्यांना मुंबईत आणलं गेलं. केंद्रिय गृहमंत्रायलयानं एन.एस.जीच्या डी.जींना आतंवाद्यांच्या खात्म्यासाठी शक्य ती सर्व पावलं उचलायला सांगितली. २०० एन. एस. जी. कमांडोना घेऊन विमान रात्री ३ वाजता मुंबईच्या दिशेनं निघालं.

ऑपरेशन ब्लॅक टोरेनेडोला (Operation Black Terinado)सुरुवात

तत्कालीन पोलिस कमिशनर राकेश मारियांनी एन.एस.जी. कमांडोना परिस्थितीबद्दल सांगितलं. ताज हॉटेल, नरिमन हाउस आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये आतंकवादी लपलेले आहेत. एन.एस.जी. कमांडोकडे कोणताच प्लॅन सुरुवातीला नव्हता. ताज हॉटेलात ६०० खोल्या होत्या. कोणत्या मजल्यावर आतंकवादी आहेत हा अंदाज मुंबई पोलिसांना देखील आला नव्हता.

२७ नोव्हेबंरला सकाळी कमांडोजनी ऑबेरॉय हॉटेलमधली सुत्रं हाती घेतली सकाळी सहा वाजता. भारतीय सेना, नेव्हीचे मार्कोज कमांडो आणि मुंबई पोलिसांच्या सहभागासोबत एन.एस.जी. कमांडोंनी ऑपरेशन सुरु केलं. संध्याकाळी ६ वाजल्यानंतर ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’ आणि दहशतवाद्यांच्यात गोळीबार सुरु होता. आतंकवाद्यांना शोधून शोधून जवानांनी खात्मा केला. ३० नागरिकांना त्यांनी सुखरुप बाहेर काढलं. ६ वाजेपर्यंत ऑबेरॉय हॉटेलमध्ये अडकलेल्या इतर १४ लोकांना बाहेर काढलं.

तर दुसऱ्या बाजूला २७ नोव्हेंबरच्याच सकाळी ताज हॉटेलमध्ये एनएसजी कमांडोजची दुसरी तुकडी सकाळी ६ वाजून ३० मिनीटांनी हॉटेलमध्ये घुसली. हॉटेलमध्ये २०० लोक अडकले होते त्यांची सुटका केली. २८ नोव्हेंबरपर्यंत हॉटेल रिकामं करण्यात आलं. आता फक्त उरलेल होते आतंकवादी आणि काही विदेशी बंधक. या ऑपरशेनमध्ये सर्व आतंवाद्यांचा खात्मा करण्यात आला सर्व परदेशी नागरिक बचावले पण दोन एन.एस.जी. कमांडो शहीद झाले. भारतीय सैन्याच्या या कारवाईमुळं ऑबेरॉय हॉटेलमधून २५० लोकांची आणि ताज हॉटेलमधून ३०० लोकांची सुटका करण्यात आली. नरिमन हाउसमधून ६० लोकांचा जीव वाचवण्यात यश आलं.

मुंबईवर हल्ला करणाऱ्या १० पैकी ९ आतंकवाद्यांचा खात्मा केला एका आतंवाद्याला जीवाची बाजी लावत पोलिस कर्माचारी तुकाराम ओंबाळी यांनी पकडलं. यात त्यांचा मृत्यू झाला. तो आतंकवादी होता अजमल कसाब. २६ नोव्हेंबरच्या रात्री सुरु झालेला हा जीवघेणा हल्ला २९ नोव्हेंबरला संपला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button