भारतात जातीअंताचा लढा तर आफ्रिकेत वर्णभेदाची लढाई लढणाऱ्या ‘चहापत्ती’ची गोष्ट

The story of 'Chaipatti' fighting the war of caste in India and the war of apartheid in Africa

एकाच कपात वाघ आणि बकरी चहा (Wagh bakari Chai)पित असल्याच चित्र पाकिटांवर छापणाऱ्या कंपनीनं भारतातील जातीवाद नष्ट करण्याचा संदेश दिला. सोबतच जातीवाद नष्ट करणाऱ्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला प्रोत्साहनही दिलं.

कटिंग म्हणा की मसाला चहा (Masala Chai), लाल चहा की अजून काही भारतात चहा हे फक्त पेय नाही. चहाला इतर पेयांहून अधिकची प्रतिष्ठा भारतात मिळालीये. सुर्योदय झाल्यापासून सुर्यास्त होईपर्यंत चहा शरिराला उर्जा देण्याच काम करत आलाय.

भारत एक असा देश आहे जिथं वेगवेगळ्या विचारधारा आहेत. इथं विविधता आणि मतभेदही आहेत. हे मतभेद चहाच्या कपासोबत सोडवल्याचे अनेक किस्से आपण पाहिलेत पण भारतातील सर्वात मोठा मतभेद दुर करण्यासाठी वाघ बकरी चहा बाजारात आला होता.

सुरुवात

नरदास देसाई(Nardas Desai) या भारतीय उद्योगपतीनं वाघ- बकरी चहाच्या उद्योगाला सुरुवात केली. या चहाचा सामाजिक न्यायासच्या लढ्यासाठी मोठं योगदान आहे. १९८२ला जेव्हा देसाईंनी आफ्रिकेच्या डरबनमध्ये ५०० एकर जमिनीवर चहा उत्पादनाच्या व्यवसायाला सुरुवात केली. त्यावेळी भारतासह आफ्रिकादेखील इंग्रजांच्या पारतंत्र्यात होतं. देसाई यांना अनेकदा वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. त्यांच यश आणि वर्णभेदाची घटना या एकमेंकाचा हात धरुनच आकार घेत होत्या.

दक्षिण आफ्रिकेत उठावाला सुरुवात झाली. अस्थिरता आणि हिंसेची चाहूल देसाईंना लागल्यामुळं त्यांना आफ्रिका सोडावी लागली. काही मौल्यवान वस्तू, गांधीचं एक शिफारशीच पत्र आणि असमानतेच्या विरुद्धच्या लढाईची उर्मी घेऊन ते भारतात परतले.

१२ फेब्रुवारी १९१५ला गांधींनी त्यांना एक पत्र दिलं ज्यावर लिहलं होतं, “मी नरेंद्र दास यांना मी ओळखत होतो. ते आफ्रिकेतले प्रतिष्ठीत चहाचे व्यापारी होते.” हे पत्र त्यांच्यासाठी खुप उपयुक्त ठरलं. याच्या जोरावरच त्यांनी १९१९ला गुजरात चहा डेपोची सुरुवात केली.

देसाईंवर गांधीचा प्रभाव फक्त स्वदेशी कंपनी चालवण्याचा नव्हता. देसाईंचे ध्येय याहून मोठे होते. त्यांनी एका सकारात्मक आंदोलनाला सुरुवात केली. चहा आणि सामाजिक सद्भावाच्या योगदान या आंदोलनातून भारताला मिळालं. त्यावेळी त्यांनी वाघ बकरी चहाचं पोस्टर बाजारात आणलं. यात वाघ आणि बकरी एकाच कपात चहा पित असल्याचं दाखवण्यात आलं. हा समतेचा संदेश होता. जातीवाद नष्ट करण्यासाठीचे त्यांचे हे पाऊल होतं. १८३४ला त्यांनी वाघ बकरी ब्रँड बाजारात आणला.

१९८०पर्यंत या ब्रँडनं मोठमोठ्या बाजारपेठा ताब्यात घेतल्या. कंपनीच्या पुढच्या वाढीसाठी त्यांना नव्या नावानं नोंदणी गरजेची होती. म्हणून त्यांनी गुजरात टी प्रोसेसिंग अँड पॅकर्स लिमटेडच्या अंतर्गत नव्या रुपानं बाजारात येण्याचा निर्णय घेतला.

गुजरातमध्ये यश मिळाल्यानंतर काही वर्षातच कंपनीनं देशभरात हात पाय पसरायला सुरुवात केली. २००३ ते २००९पर्यंत अनेक राज्यात या ब्रँडचा विस्तार झाला. सामाजिक न्यायासारख्या महत्वपूर्ण मुद्द्यात या कंपनीनं लक्ष घातलं. अनेक विदेशी मार्केटींग पंडीतांनी वाघ बकरीची सामाजिक जाणीव आणि मार्केटींगमाध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या प्रयत्नांची दखल घेतलीये.

आज वाघ बकरी हा ब्रँड दिड हजार कोटी रुपयांची उलाढाल करतोय. ४ कोटी किलोग्रॅमहून जास्त चहापत्ती दरवर्षी वितरीत केली जाते. देशभरातल्या प्रत्येक घरात वाघ- बकरी चहानं आपलं स्थान निर्माण केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER