राजवटीविरुद्ध बंड पुकारणाऱ्या एका सामर्थ्यवान महिलेची कहाणी…

The story of a powerful woman who rebelled against the monarchy ...-Maharashtra Todayt
  • अंग झाकण्यासाठी मोजावी लागायची किंमत

आजपासून तीनशे वर्षांपुर्वी दक्षीण भारतातील त्रावणकोर राज्यात एक करपद्धत होती. दलित आणि मागास जातीतील महिलांना स्तन झाकण्यासाठी टॅक्स चुकवावा लागयचा.( pay tax to cover their breasts) ही बाब शर्मेची होती. महिलांना स्तन झाकण्यासाठी कर द्यावा लागायचा. उच्च जातीय लोकांच्या सन्मानासाठी हे करणं भाग असल्याची त्याकाळात समज होती. स्त्री आणि पुरुष दोघांसाठी हा कर लागू होता. या कर वसुलीला ‘मुलाक्कारम’ म्हणलं जायचं. दलित कुटुंबातील मुली वयात आल्या की हा कर त्यांना लागू व्हायचा. सर्वात घृणास्पद बाब ही होती की स्त्रीयांच्या स्तानाच्या आकारावरुन कराची रक्कम ठरायची.

‘नंगेली’नं स्तन कापून केला विरोध

नंगेलीचं (Nangeli)नाव केरळ बाहेर चुकुनच कुणीतरी ऐकलं असेल. शालेय पुस्तकात तिच्या बंडखोरीचा न कुठे उल्लेख सापडतो न कुठे तिचा फोटो पहायला मिळतो. पण ती साहसाची जळती मशाल होती. कारण तिनं स्तन झाकण्याच्या अधिकारासाठी स्तन कापून विरोध केला होता. केरळच्या इतिहासात आजही या ऐतहासिक लढ्याचा उल्लेख आहे. केरळवर त्रावणकोर साम्राज्याच शासन होतं तेव्हाची ही गोष्ट आहे.

त्यावेळी जातीवादाची मुळं खुल समाजमनात रुजली होती. सवर्णांनी दलित आणि मागास जातीतील महिलांना स्तन न झाकण्याचे आदेश दिले होते. जर स्तन झाकायचे असतील तर ठरलेला कर द्यायला लागायचा. दोन वेळच्या जेवणाच नियोजन ज्यांना व्हायचं नाही ते कराची रक्कम कुठुन उभी करणार. त्यामुळं या स्त्रीयांवर हालाखीची वेळ आली होती. जातीवादी रचना अबाधित रहावी म्हणून असे कायदे त्रावणकोर संस्थानामध्ये करण्यात आले होते.

केरळमध्ये नायर जातीला शुद्र मानलं जातं. या जातीखाली एडवा आणि परत दलित समुदाय सामील होतो. नंगेलीची परिस्थीती बिकट होती. कर देण्यासाठी पैसे नसल्यानंत तिचं कुटुंब दिवसेंदिवस कर्जात बुडत चाललं होतं. अधिकारी कर वसुल करायला नंगेलीच्या घरात आला. तेव्हा तिनं स्वतःच स्तन कापून केळाच्या पानावर ठेवलं. ते पान अधिकाऱ्यासमोर ठेवलं. अधिकारी तिथून पळून गेला. तिनं मोठं धाडस दाखवलं पण यामुळं मोठा रक्तपात झाला. घराच्या उंबऱ्यावरच तिचा मृत्यू झाला.

काही वेळेनंतर नंगेलीचा पती चिरुकंदन घरी आला तेव्हा त्याला हकिकत समजली. त्याच्या पत्नीला स्मशानात नेलं जातं होतं. अग्निही दिला होता. तेव्हा अंत्यसंस्कारावेळी नंगेलीच्या पतीनं चितेत उडी घेऊन जीव दिला. नांगेलीनं केरळच्या सर्व स्त्रीयांच्या स्वाभीमानाला जिवंत ठेवण्यासाठी स्वतः मरण पत्करलं. तिच्यामुळं राजाला हा कर बंद करावा लगाला. १८०३ साली ही घटना घडली. दलितांना मिळणाऱ्या घृणास्पद वागणूकीची ही परिसीमा होती. लोक आक्रमाक झाले. जनतेच्या रोषाचा राजाला सामना करावा लागला. १८१३ ला त्यानं कर मागं घेतला.

इतिहासातली ही पहिली घटना होती जेव्हा एका पतिनं पत्नीच्या चितेत उडी मारुन जीव दिला होता.

चिन्नर विद्रोहातून ही झाला होता विरोध

नंगेलीच्या बलिदाना आधी या घृणास्पद व्यवस्थेचा विरोध व्हायला सुरुवात झाली होती. वर्ष १८१३ आणि १८५९ ला नादर समाजाच्या महिलांनी देखील या विरोधी आवाज उठवला होता. सवर्ण महिलांप्रमाणे दलित आणि मागास जातीतील महिलांना स्तन झाकायचा अधिकार मिळावा, ही मागणी त्यांनी केली होती.

आज भारतात अनेक समाजसुधारकांनी केलेल्या कार्यामुळं आणि स्त्रीमुक्ती चळवळीमुळं आज स्त्रीयांची परिस्थिती सुधारत आहे. आशादायी बाब आहे.

१८१३ ला त्रावण कोर्टचे दिवाण कर्नल जॉन मुनरो यांनी आदेश दिला की जर महिलांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर त्यांना स्तन झाकण्याची परवानगी मिळेल. यानंतर त्यांना ब्लाउज घालायची परवानगी मिळाली. नादर जातीतील स्त्रीयांना मोठ्या व व प्रमाणात ख्रिश्चन धर्म स्वीकारायला सुरुवात केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER