खरेदीमुळे शेअर बाजाराची सुरुवात तेजीने

Share Bazaar

मुंबई : बाजारात खरेदीचा ओघ कायम राहिल्याने शुक्रवारी सकाळी शेअर बाजारात तेजीने झाली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स १८० अंकांनी वाढून ४१ हजार ५३० अंकावर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३० अंकांच्या वाढीसह १२ हजार २०५ अंकावर आहे.

आशियातील शेअर बाजारात आज सकाळी सकारात्मक संकेत दिसले. सिंगापूर एक्सचेंजमध्ये तेजी होती. मात्र, जपान आणि दक्षिण कोरियातील शेअर बाजारांवर दबाव होता. गुरुवारी अमेरिकेतील डाऊ निर्देशांकात १२८ अंकांची घसरण झाली होती.

आज मुंबई शेअर बाजारात नेस्ले, एशियन पेंट्स, टायटन, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, ऍक्सिस बँक, हिरोमोटो कॉर्प, सन फार्मा, मारुती, एसबीआय, बजाज ऑटो, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, ओएनजीसी, रिलायन्सचे शेअर तेजीत आहेत. आज ९४६ कंपन्या तिमाही निकाल जाहीर करणार आहेत. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयात ७१.२० ते ७१.८० च्या दरम्यान राहील असा अंदाज आहे.