शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने

Stock Market Crash

नवी दिल्ली :- शेअर बाजाराची सुरुवात गुरुवारी किरकोळ घसरणीने झाली. सूचकांक २९८.३६ अंकांनी घसरून ३९६२४.१० वर खुला झाला. तर निफ्टी ९६.३० अंकासह घसरून ११६३३.३० वर खुला झाला. गेल्या सत्रात शेअर बाजारात (Share Market) दिवसभर चढ-उतार सुरू होते. नंतर मोठी घसरण होऊन बाजार बंद झाला.

सेंसेक्स ५९९.६४ च्या घसरणीने ३९९२२.४६ वर बंद झाला होता. निफ्टी १५९.८० च्या घटीसह ११७२९.६० वर बंद झाला होता. आज प्रमुख शेअर्समध्ये टेक, महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, इचर मोटर्स आणि एल अँड टीची सुरुवात हिरव्या निशाण्याने झाली. दुसरीकडे श्री सीमेंट, भारती एअरटेल, बजाज ऑटो आणि एनटीपीटीची सुरुवात घटीसह झाली. सेक्टोरियल इंडेक्समध्ये आज सर्व सेक्टर लाल निशाण्यावर खुले झाले.

प्रायव्हेट बँक, फायनान्स  सर्व्हिसेस, रियल्टी, पीएसयू बँक, मीडिया, एफएमसीजी, फार्मा, रियल्टी, आयटी, ऑटो आणि प्रायव्हेट बँक यात समावेश आहे. सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेला सर्वाधिक नुकसान होते आहे. यात सुमारे ३.४५ टक्के घट आली. याशिवाय एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स अल्ट्राटेक सीमेंट आणि एचडीएफसी बँकेचे शेअरही घसरले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER