सलग आठव्या दिवशी शेअर बाजारात तेजी

Sensex Stock Market

मुंबई : जागतिक स्तरावर सामान्य सकारात्मक संकेतासह शेअर बाजार सलग आठव्या दिवशी तेजीत बंद झाला. BSE च्या ३० शेअरवर आधारित संवेदी सूचकांक ८४. ३१ अंक म्हणजे ०. २१ टक्क्यांनी वाढून ४०,५९३. ८० वर बंद झाला. तर निफ्टी १६. ८० अंकासह ०. १४ टक्के वाढीसह ११, ९३१ वर बंद झाला.

आयटीसीच्या शेअरमध्ये सर्वाधिक २. ५९ टक्के तेजी होती. इन्फोसिस २. २३ ने वाढला. या शिवाय एशियन पेन्ट, एचसीएल टेक, पावरग्रीड, मारुती, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, टेक महिंद्रा, टाटा स्टील, बजाज फाइनान्स आणि एसबीआयचे शेअर वाढीसह बंद झाले.

शेअर बाजारांची सुरूवात सकारात्मक झाली. त्यानंतर प्रोत्साहन पॅकेजच्या घोषणेसाठी अर्थ मंत्री निर्मला सीताराम यांनी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर खरेदीदारांनी जरा सावध पवित्रा घेतला.

सणाच्या काळात मागणीत तेजी आणण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला मजबूती देण्यासाठी एलटीसीच्या जागी कॅश व्हाऊचर आणण्याचा आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सणआधी १०,००० रुपये अॅडव्हान्स देण्याचीघोषणा अर्थमंत्र्यांनी केली.

रिलायन्स सिक्योरिटीजचे प्रमुख ( कॉर्पोरेट बिझनेस) अर्जुन यश महाजन यांनी म्हटले की, अॅडव्हान्स आणि कॅश व्हॉऊचरच्या माध्यमातून ग्राहकांची मागणीला प्रोत्साहित करण्याचा हा सरकारचा छोटा प्रयत्न आहे. सातत्याने वृद्धीसाठी कोणतीही भूमिका दिसत नाही. दरम्यान, शांघाय, हॉंगकॉंग आणि सेऊलच्या बाजारातही तेजी होती. टोकिओ शेअरबाजार मात्र मंदीने बंद झाला. युरोपच्या बाजारात तेजी दिसली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER