बाजारासाठी संतुलित आठवड्याचा अंदाज

- निफ्टी ११ हजारावर राहणार

The stock market is forecast to remain positive next week

मुंबई : सकारात्मक अर्थसंकल्प व रिझर्व्ह बँकेकडून दर कपात झालतानंतरही आठवड्याच्या अखेरच्या दिवशी घसरलेला शेअर बाजार पुढील आठवड्यात मात्र सकारात्मक राहण्याचा अंदाज आहे.

मागील आठवडा भारतीय अर्थकारणातील मलभ दूर करणारा होता. परिणामी शेअर बाजारासुद्धा वधारलेला असेल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र शुक्रवारी मोठ्या गुंतवणूकदारांनी नफेखोरी केली. त्यामुळे सक्षमता असतानाही बाजार घसरला. पुढील आठवड्यात मात्र चित्र सकारात्मक असेल, अस अंदाज आहे.

पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांनी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीवर लक्ष केंद्रित करावे, असा गुंतवणूकदारांचा सल्ला आहे. या दरम्यान निफ्टी सातत्याने ११ हजारांच्या वर राहण्याचा सकारात्मक अंदाज आहे. पण नफेखोरी झाल्यास तो १०,९०० पर्यंत घसरू शकतो. त्यावेळी गुंतवणूकदारांनी दक्ष राहण्याचा सल्ला तद्यांनी दिला आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मात्र ३६ हजार अंकांदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.