शेअर बाजार हजार अंकांनी कोसळला

corona-Sensex stock market-Starting to fall

मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या परत वाढत असल्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजार आज १ हजार १४५ अंकांनी कोसळला, ४९, ७४४ अंकावर बंद झाला. त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंजही २ टक्क्यांनी खाली आला असून तो ३०० अंकांनी खाली येऊन दिवस अखेरीस १४,६७५ पर्यंत स्थिरावला. दोन महिन्यांनंतर शेअर बाजार सलग पाच सत्रात खाली आला. आजच्या सत्रात निफ्टी मेटल निर्देशांक सोडला तर सर्व क्षेत्रातील निर्देशांत हे खाली येत होते. मेटल निर्देशांकही दिवस अखेरीस फक्त १.६ टक्के वाढ दर्शवत होता. दिवभरातील माध्यम क्षेत्रातील निर्देशांवर सर्वात जास्त नकारात्मक परिणाम झाला. हा निर्देशांक ३.४ टक्क्यांनी खाली आला. यात मल्टीप्लेक्स चेन असलेले पीव्हीआर आणि आयनोक्स यांचा समावेश आहे. याचबरोबर आयटी, फार्मा, सार्वजनिक बँक यांच्या निर्देशांकातही जवळपास २.५ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. ऑटो क्षेत्रातही २.३ टक्क्यांची घसरण झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER