करोनाच्या धास्तीने शेअर बाजार १ हजार अंकांनी कोसळला

Stock Market Down - Corona Virus

नवी दिल्ली : कोरोनाबाबत युरोपमध्ये निर्माण झालेल्या धसक्याने आर्थिक जगताला धक्के बसत आहेत. याचा मोठा परिणाम मुंबईच्या शेअर बाजारावर झाला. सतत सहाव्या दिवशी बाजाराची घसरण सुरू राहिली. सूचकांक १ हजाराच्या कोसळला. सेन्सेक्स ३८,७०४ तर निफ्टी ११,३३३ पर्यंत उतरला. ३०० अंक खाली.

टाटा स्टील, टाटा महिंद्रा, बजाज फायनान्स, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि ओएनजीसी या कंपन्यांचे शेअर ५.३१ टक्क्यांपर्यंत पडले.

दरम्यान, जगभरात करोना विषाणूग्रस्तांची संख्या ८१ हजारांवर पोहचली आहे. डेरिव्हेटिव्ह कंत्राटांची मुदतपूर्ती आज, शुक्रवारी होणार आहे. चीनमधून येणाऱ्या मालाची आवक थांबली आहे. त्यामुळे बाजारावर विपरित परिणाम होतो आहे.