मृत्यूनंतर १५ वर्षांनी पुसला  गेला भ्रष्टाचाराचा कलंक !

Payal Tadvi case: HC pulls up state for delaying registering statements
  • दिवंगत विक्रीकर अधिकार्‍यास मरणोत्तर दिलासा

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या विक्रीकर विभागातील एका माजी अधिकार्‍यास लागलेला भ्रष्टाचार केल्याचा कलंक त्याच्या मृत्यूनंतर १५ वर्षांनी अखेर पुसला गेला आहे. त्यावेळी सोलापूर येथे नोकरी करणार्‍या  सुरेश कागणे यांना ‘एसीबी’ विशेष न्यायालयाने दोषी ठरवून १८ महिन्यांचा कारावास व २६ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. त्याविरुद्ध कागणे यांनी केलेले अपील उच्च न्यायालयाने आता त्यांच्या मृत्यूनंतर मंजूर करून त्यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे.

सन १९८६ मधील या प्रकरणात कागणे व अन्य दोघांना १९९६ मध्ये शिक्षा झाली होती. त्यांचे सन २००५ मध्ये निधन झाल्यानंतर कागणे यांचे उच्च न्यायालयातील अपील त्यांच्या पत्नी व पुढे चालविले होते. कागणे यांच्यासोबतच्या अन्य दोन सहआरोपींची अपिलेही सन २०१३ मध्येच मंजूर होऊन त्यांनाही निर्दोष ठरविले गेले होते. अशा प्रकारे आता सर्व अपिले संपल्यानंतर या खटल्यात कोणीच दोषी नाही अशी स्थिती आली आहे.

एका खाद्यतेल उत्पादक कारखानदारास नियमबाह्य पद्धतीने विक्रीकर परतावे मंजूर करून शासनाचे २.६ लाख रुपयांचे नुकसान केल्याबद्दल हा मूळ खटला दाखल केला गेला होता. ज्याला परतावे मंजूर झाले होते त्या कारखानदाराचा मुलगाही या खटल्यात आरोपी होता. परंतु त्याला माफीचा साक्षीदार कले गेले होते. त्याच्याच साक्षीवर विसंबून विशेष न्यायालयाने कागणे व इतर देघैंना दोषी ठरविले होते. परंतु उच्च न्यायालयाने या माफीच्या साक्षीदाराची साक्ष विश्वासार्ह मानली नाही.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER