
मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chauhan) आत्महत्या प्रकरणात ठाकरे सरकार (Thackeray Goverment) अडचणीत आल्यानंतर या प्रकरणातील संशयित मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी आज राजीनामा दिला. रेणु शर्मा प्रकरणात आता भाजपाचे (BJP) लक्ष्य धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा आहे.
या संदर्भात भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली. त्यांनी ट्वीट केले – एका मंत्र्याच्या राजीनाम्याची एक निर्णयाची पायरी उशिराने का होईना ओलांडली आता निष्पक्षपातीपणे चौकशीचा डोंगर सरकारला ओलांडायचा आहे. सरकारच्या इतिहासात महिलांच्या बद्दल एवढा दुजाभाव आणि सामाजिक व्यवस्थेची इतकी दुरवस्था आपल्या महाराष्ट्राला शोभणारी नाही.
एका मंत्र्याच्या राजीनाम्याची एक निर्णयाची पायरी उशिराने का होईना ओलांडली आता निष्पक्षपातीपणे चौकशी चा डोंगर सरकारला ओलांडायचा आहे.. सरकारच्या इतिहासात महिलांच्या बद्दल एवढा दुजाभाव आणि सामाजिक व्यवस्थेची इतकी दुरवस्था आपल्या महाराष्ट्राला शोभणारी नाही. https://t.co/qPn33FbOAx
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) February 28, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला