
भाजपा भाजपा (BJP) आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी आज नाशिक येथे महावसुली आघाडी सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळत होळी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपल्या शक्तीचा दुरुपयोग केला म्हणून हिरण्यकश्यपु या राक्षसाची बहीण ‘होलिका’ अग्नीत जळून भस्मसात झाली म्हणूनच आपण ‘होळी’ साजरी करतो.
आज राज्यातसुद्धा हेच चित्र सुरू आहे. हे राज्यातलं ठाकरे सरकार शेतकऱ्यांवर अन्याय, महिलांवर अत्याचार , साधु-संतांची हत्या, त्यांची निंदा-नालस्ती आणि जनतेकडून खंडणी वसूल करत आहे. आणि म्हणून आज या होळीच्या पवित्र दिवशी या सरकारचा निषेध म्हणून आम्ही अग्निदेवतेला प्रार्थना केली की, आपल्या सत्तेचा आणि शक्तीचा दुरुपयोग करणारं हे राज्यातलं महावसुली आघाडी सरकार लवकरात लवकर अग्नीत जळून भस्मसात होऊ दे आणि महाराष्ट्राचे कल्याण होऊ दे. यावेळी भाजपा नाशिक ग्रामीण युवा मोर्चा संघटन सरचिटणीस समीर काळे, उपाध्यक्ष राहुल बोराडे, चिटणीस पंकज मिश्रा, नरेश कोसरे, सदस्य संतोष मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला