राज्यात आज 63,309 नव्या रुग्णांची नोंद, तर 985 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Maharashtra Coronavirus

मुंबई :- राज्यात आज कोरोनाचा (Corona) उद्रेक झाल्याचे दिसून आले. बाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊनही (Lockdown) करण्यात आलाय. परंतु तरीही रुग्ण संख्या दिवसागणिक वाढत चाललीय. राज्यात दररोज 60 हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. आजही राज्यात 63,309 नव्या रुग्णांची नोंद झालीय. राज्यात आज रोजी एकूण 6,73,481 सक्रिय रुग्ण आहेत. विशेष म्हणजे राज्यात आज 985 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालीय, सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 टक्के एवढा आहे.

राज्यात आज 63,309 नव्या रुग्णांची नोंद झाल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 44,73,394 झालीय. राज्यात आज 62,181 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आजमितीस एकूण 37,30,729 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 83.4 टक्के एवढे झाले आहे. आजमितीस तपासण्यात आलेल्या 2,65,27,862 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 44,73,394 (16.86 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 42,03,547 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर 31,159 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button