“केंद्राप्रमाणे राज्यानेही व्यवस्था उभी करावी, वारंवार केंद्राकडे बोट दाखवू नये” : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis - Maharastra Today

नाशिक : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी नाशिक येथील सिव्हिल रूग्णालयास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी माध्यमांशी सवांद साधला. “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने अतिशय तर्कशुद्ध व्यवस्था उभी केली आहे, तशीच राज्यानेही करावे. वारंवार केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही, आपल्या सर्वांना एकत्र काम करावे लागेल.” असे फडणवीस म्हणाले .

फडणवीसांनी सांगितले की, “माझ्यापरीने होईल ते मी राज्यासाठी करतोच, केंद्र सरकारने रेमडेसिवीरचा आणि ऑक्सिजनचा सर्वाधिक साठा हा महाराष्ट्राला दिला. जवळ-जवळ पहिल्याच खेपेत १ हजार १०० व्हेंटिलेटर हे महाराष्ट्राला दिले. आता पीएसए प्लॅन्टदेखील मोठ्या प्रमाणात राज्याला दिलेत. त्यामुळे मला असे वाटते की, आपल्या सर्वांना एकत्रित काम करावे लागणार आहे. पंतप्रधान मोदींनी वारंवार सांगितले की, आज एकत्रितपणे जनतेच्या पाठीशी आपण उभे राहायला हवे. त्यामुळे कोणालाही बोट दाखवणे योग्य नाही. आपल्याकडे उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करायला हवा. नाशिकचा पॉझिटिव्हिटी रेट हा ३० टक्क्यांवर चालला आहे. अशा परिस्थितीत इथे ऑक्सिजन किंवा रेमडेसिवीरची आवश्यकता जास्त आहे. त्यामुळे ही अवस्था लक्षात घेता ही व्यवस्था या ठिकाणी केली पाहिजे.”

त्याचबरोबर, “प्रशासन आपल्यापरीने काम करत आहे, आणखी काय मदत करता येईल. त्याप्रकारे आम्ही प्रयत्न करतो आहोत. रेमेसिवीरचा पुरवठा सातत्याने व्हावा, यासाठी आमचा दबाब आहेच. राज्याच्या कोट्याच्याव्यतिरिक्त काही वाढीव कोटा मी नाशिकसाठी मिळवून घेतला आहे.” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button