राज्यावर तौक्तेचे अस्मानी संकट; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक सुरू

cm uddhav thackeray - amit shah - Maharashtra Today

मुंबई : एकीकडे राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे राज्यावर आता अस्मानी संकट उभं ठाकलं आहे. अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळ आता हळूहळू उग्र रूप धारण करत असून राज्याच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. एकीकडे कोरोना (Corona) विषाणूचं संकट असताना चक्रीवादळाच्या या नव्या संकटामुळे राज्य दुहेरी कात्रीत सापडलं आहे. चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीशी लढण्यासाठी राज्यानं तयारी केली अजून धोक्याच्या ठिकाणी एनडीआरएफच्या जवानांना तैनात केलं आहे.

या आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत इतर वरिष्ठ पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

या बैठकीत ‘तौक्ते’ चक्रीवादळने निर्माण केलेल्या आपत्कालीन परिस्थितीवर महत्त्वाची चर्चा झाली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेही उपस्थित होते. या बैठकीत कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, याबाबतची अद्यापही माहिती समोर आली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button