राज्यातील मंत्री हाथरसला गेले पण, गृहमंत्री शेजारच्या हिंगणघाटमध्ये जाऊ शकले नाही? – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis-Anil Deshmukh

मुंबई :- उत्तरप्रदेशातील हाथरस येथे सामूहिक बलात्कार (Hathras Rape Case) हत्येची घटना घडली. या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त करण्यात आला. त्यातच महाराष्ट्रातील नेत्यांनीही हे प्रकरण उचलून धरले. यावरून महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील सत्ताधा-यांना संतप्त प्रश्न करत टीकास्त्र सोडले आहे. राज्यातील एक मंत्री हाथरसच्या ठिकाणी गेले; पण गृहमंत्र्यांना शेजारच्या हिंगणघाटला जाता आले नाही.

तुमच्या बाजूला एका महिलेला जाळून टाकलं तेव्हा तुम्ही का गेलात नाही ? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना केला आहे. आज मुंबईत भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी फडणवीस यांनी राज्यातील सत्ताधा-यांवर निशाणा साधला. हाथरस घटनेवरून फडणवीस यांनी काही प्रश्न उपस्थित केले व राजस्थानच्या घटनेचे उदाहरण देत राज्य, जात, समाज, राजकीय व्यवस्था पाहून रस्त्यावर उतरत असाल तर मग तुम्ही किती बेगडी आहात, राजस्थानच्या दलित भगिनीबद्दल का आंदोलन नाही ? असाही प्रश्न त्यांनी केला.

तसेच, फडणवीस यांनी यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही राज्य सरकारवर टीका केली. मराठा आंदोलकांचा उद्रेक अगदी योग्य असल्याचेही सांगितले. आंदोलनं ही चर्चेच्या माध्यमातून सुटतात. राज्यकर्त्यांना कायदा करण्याचे अधिकार विधिमंडळाने दिले आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात पूर्ण महाराष्ट्रात संताप आहे, आरक्षण नको म्हणू राज्य सरकारचे वेळकाढूपणाचे  धोरण असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER