राज्याकडे तीन कोटी लसी ठेवण्याची क्षमता

Coronavirus Vaccine

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने लसींच्या कुप्या साठवणुकीसाठीची व्यवस्था वाढविण्यास सुरुवात केली आहे. सध्या राज्यात तीन कोटी लस (3 Crore Vaccine) कुप्या साठवण्याची तयारी पूर्ण करण्यात आली असून राज्य सरकारने केंद्राला कोल्ड चेन पुरवठा व साठवण सुविधांविषयी सविस्तर स्थिती अहवाल दिला आहे.

देशात सध्या पाचपेक्षा अधिक कोरोना प्रतिबंधित लसींवर काम सुरू असून त्यातील सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हीशिल्ड व भारत बायोटेक कंपनीची लस चाचणी अंतिम टप्प्यात आहे. शिवाय इंग्लंडमधील फायझर कंपनीची लस तयार झाली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात यातील एखादी लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र लस पुरवठा व साठवण करण्यासाठी खास खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी राज्य सरकारची तयारी सुरू आहे.

कोविड लसीकरण मोहिमेचा इतर लसीकरणावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र कोविड लसीकरण मोहिमेचा इतर लसीकरण कार्यक्रमांवर परिणाम होणार नाही, असे रामास्वामी यांनी स्पष्ट केले. कोविडचा सामना करण्यासाठी कोणती लस मंजूर झाली आहे आणि ते तापमान कसे संचयित करावे लागेल यावर सर्व अवलंबून असेल. सध्या आपल्याकडे दोन प्रकारच्या सुविधा उपलब्ध असून त्यात 2 अंश सेल्सिअस आणि 8 अंश सेल्सिअस तापमानात नित्य लसीकरण लस ठेवू शकतात. याशिवाय दोन नवीन वॉक-इन कूलरच्या मदतीने 15 अंश ते 25 अंश सेल्सियस तापमानात लस ठेवण्याची क्षमता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER