राज्य विकासाची तळमळ असलेला कुशल प्रशासक गमावला-सुधीर मुनगंटीवार

Mungatiwar

मुंबई :- महाराष्ट्राच्या प्रशासनात माजी मुख्य सचिव अरूण बोंगिरवार यांचे महत्वाचे योगदान असून राज्य विकासाच्या प्रक्रियेत त्यांनी अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने राज्य विकासाची तळमळ असलेला एक कुशल प्रशासक गमावला आहे अशा शब्दात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

औरंगाबाद, कोकण आणि पुणे विभागाचे विभागीय आयुक्त, विविध विभागांचे सचिव म्हणून त्यांचे काम उल्लेखनीय राहिले आहे. मुख्य सचिव पदावर काम करतांना राज्य विकासाला दिशा देणारे, समतोल सामाजिक विकासाचा ध्यास असणारे दूरदृष्टीचं व्यक्तिमत्त्व म्हणून श्री. बोंगिरवार यांचा नेहमीच आवर्जून उल्लेख करावा लागेल, मी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो, असेही श्री. मुनगंटीवार यांनीआपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.