कोरोना काळात राज्य सरकारने ऊसतोड कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी घ्यावी – पंकजा मुंडे

Uddhav Thackeray & Pamkaja Munde

बीड : ऑक्टोबर महिन्याच्या दुस-या आठवड्यात गाळप हंगाम सुरू होईल. तेव्हा हजारो स्थलांतरीत ऊसकामगार ऊसतोडणीसाठी बाहेर पडतील. राज्यातील कोरोनाची स्थ्ती पाहता राज्य सरकारने या ऊसतोड कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी घ्यावी असे आवाहन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्याचबरोबर मुंडे यांनी ऊसतोड कामगारांनाही सोबत लहान मुले व वृद्धांना बरोबर नेऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मुंडे म्हणाल्या,  कामगारांच्या संघटना, कोरोना विषाणूचा विळखा पडू नये तसेच त्यांच्यापासूनही कोणाला बाधा होऊ नये यासाठी साखर आयुक्त कार्यालयाने त्यांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी साखर कारखान्यांवर सोपवली आहे. कामगार थेट शेतात काम करणार असले तरी कारखान्याने त्यांच्यासाठी सॅनिटायझर, मास्क व अन्य आरोग्य सुविधा पुरवाव्यात असे कारखान्यांना कळवण्यात आले आहे.

साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, वृद्धांना बरोबर न्यायला मनाई करणे शक्य होते, मात्र तसे न करता फक्त आवाहन करण्यात आले आहे. अनेक कुटुंबांना वृद्ध व्यक्तींना मागे एकटे ठेवणे शक्य नसते. त्यामुळे चर्चेअंती मनाई करायची नाही असे ठरवण्यात आले, मात्र त्यांना कामावर न नेता मुक्कामाच्या ठिकाणी ठेवावे, त्यांच्यासाठी कारखान्यांनी वेगळी व्यवस्था करावी असे सांगण्यात आले आहे. मुलांसाठी साखर शाळा, अगदी लहान मुलांसाठी पाळणाघरे या नेहमीच्या सुविधा याही वेळी कारखान्यांनी करायच्या आहेत असे गाडकवाड यांनी सांगितले.

दरम्यान, ऊसतोड कामगारांच्या मजूरी वाढीबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या,  मजूरीतील दरवाढ हा लवादाचा विषय आहे. साखर संघाची याविषयाबाबत लवकरच बैठक होत आहे. त्यांनी ठरवलेल्या दराबाबत यासंबधीच्या लवादात चर्चा होईल. त्यात कामगारांची प्रतिनिधी म्हणून मी, साखर कारखानदारांचे प्रतिनिधी म्हणून मंत्री जयंत पाटील व अन्य काही वरिष्ठ अधिकारी आहेत. तिथे चर्चा होऊन दर ठरेल. आत्ता तरी कामगारांच्या वतीने आम्ही काही प्रस्ताव वगैरे दिलेला नाही, मात्र कोरोना मुळे या कामगारांची झालेली परवड लक्षात घेता दरवाढ दिली पाहिजे. ती किती याबाबत लवादात निर्णय होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER