‘राज्याच्या सद्यस्थितीला राज्य सरकारच जबाबदार’, काँग्रेस नेत्याचे थेट मोदींना पत्र

Maharashtra Today

मुंबई :- कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे लॉकडाऊन, लसीकरण आणि औषध पुरवठ्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असतानाच काँग्रेस नेते आशिष देशमुख (Aashish Deshmukh) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पत्र (Congress leader’s direct letter to Modi) लिहून राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लागू करण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. एकीकडे राज्य सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांवर विरोधकांकडून टीका होत असतानाच आता काँग्रेसच्या नेत्यानेही ठाकरे सरकारवर (Thackeray Govt) जोरदार टीका करत घरचा आहेर दिला आहे.

काँग्रेसचे आमदार आशिष देशमुख यांनी ठाकरे सरकारकडून कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन जोरदार टीका केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येणारे प्रयत्न अपुरे पडत आहे. सध्या परिस्थितीला राज्य सरकारच जबाबदार असल्याचे सांगत आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रामधून आशिष देशमुख यांनी राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावण्याची मागणी केली आहे.

आशीष देशमुख यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. त्यात ते म्हणतात की, महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यामध्ये घटनेतील कलम ३६० अन्वये किमान दोन महिन्यांसाठी आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली आहे, असे आशिष देशमुख यांनी या पत्रात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button