डे-नाईट टेस्टचा स्टार गोलंदाज, गुलाबी बॉलने केली सर्वाधिक शिकार

Pink Ball

मिशेल स्टार्क (Michelle Stark) भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज आहे. पहिल्या कसोटी सामन्यात मिशेल स्टार्कचे पुनरागमन यजमान ऑस्ट्रेलियन संघाला बळकट करेल. या वरिष्ठ वेगवान गोलंदाजाने गुलाबी बॉल (Pink Ball) सामन्यात उत्तम कामगिरी केली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज स्टार्कने आतापर्यंत सात  दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये गुलाबी चेंडूने १९.२३ च्या सरासरीने ४२ विकेट्स घेतल्या आहेत.

कौटुंबिक समस्येमुळे सोमवारी तो संघात सामील झाला. एडिलेडमध्ये १७ डिसेंबरपासून गुलाबी कसोटी सामना खेळला जाईल. वास्तविक, ३० वर्षीय स्टार्क  गुलाबी चेंडू टाकणारा सर्वांत यशस्वी गोलंदाज आहे. दुसर्‍या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा एकमेव स्टार स्पिनर नॅथन लायन आहे, ज्याने गुलाबी कसोटीत २८ बळी घेतले आहे.

नॅथन लायनसाठी ही कसोटी मालिका खूप महत्त्वाची आहे. ४०० बळी पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त १० बळींची आवश्यकता आहे. त्याने आतापर्यंत ९६ कसोटी सामन्यांमध्ये ३९० विकेट्स घेतल्या आहेत आणि शेन वॉर्न (७०८), ग्लेन मॅकग्रा (५६३) नंतर ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. डे-नाईट कसोटीबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियन संघ अद्याप अजेय आहे. कांगारूंनी यापूर्वी सात  कसोटी सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत.

नोव्हेंबर २०१५ मध्ये एडिलेडमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळला गेला. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या डे-नाईट कसोटी सामन्यांचे निकाल आले आहेत, एकही सामना अनिर्णीत राहिला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER