मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा वेग चक्रीवादळाला लाजवणारा; उद्धव ठाकरे खरच बेस्ट सीएम! मनसेचा टोमणा

Raj Thackeray-CM Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या कोकण दौऱ्याचा वेग चक्रीवादळालाही लाजवेल, असा होता. ते खरच देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री आहेत, असा टोमणा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मारला.

मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे. पुराणकाळात देवी – देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात, असे संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. (MNS leader Sandeep Deshpande take a dig at CM Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ‘तौत्के’ चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा काही तासांचा दौरा केला. विरोधकांनी उद्धव ठाकरे यांच्या या धावत्या भेटीवर टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी विमानतळापासून १० किलोमीटर अंतरावरील भागांची पाहणी केली. आत जाऊन कुठल्याही गावाला भेट दिली नाही. ‘यालाच म्हणतात “lipstick” दौरा, अशी बोचरी टीका भाजपायाचे आमदार नितेश राणे यांनी केली.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button