राज कपूर आणि नर्गिसच्या पहिल्या भेटीची विशेष कथा, अभिनेत्रीला पाहिल्यानंतर हृदय गमावून बसले होते शोमॅन

Raj Kapoor & Nargis.jpg

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि शोमॅन राज कपूर यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी झाला होता. राज कपूर यांनी आपल्या ५० वर्षांच्या कारकीर्दीत कॅमेरासमोर आणि मागे अनेक महान कार्य केले आहेत. त्यांना ३ राष्ट्रीय पुरस्कार, ११ फिल्मफेअर ट्रॉफी, पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. राज कपूर यांच्या फिल्मी करिअर व्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यावरही बरीच चर्चा झाली आहे. राज कपूर आणि नर्गिस यांच्या सर्वात चर्चेत कथेबद्दल जाणून घेऊ…

राज कपूर आणि नर्गिस दत्त यांची १९४८ मध्ये पहिली भेट झाली होती. दोघांच्या भेटीची कहाणी खूप रंजक आहे. नरगिस आणि राज कपूरची पहिली भेट झाली तेव्हा नर्गिस फक्त २० वर्षांची होती. त्यावेळी राज कपूरसुद्धा २२ वर्षांचे होते. पण नर्गिसने या २० वर्षाची होत पर्यंत आठ चित्रपटांत भूमिका केली होती आणि राज कपूर पदार्पण करत होते.

दोघांच्या भेटीची कहाणी खूप रंजक आहे. राज कपूर यांना नर्गिसची भेट होईपर्यंत कोणताही चित्रपट दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली नाही. राज कपूर आपल्या पहिल्या चित्रपटासाठी स्टुडिओ शोधत होते. त्यांना माहित झाले की नर्गिसची आई फेमस स्टुडिओमध्ये रोमियो आणि ज्युलियटचे चित्रीकरण करत आहे. त्यांना कोणत्या प्रकारच्या सुविधा तेथे आहेत हे जाणून घ्यायचे होते?

यासंदर्भात राज कपूर तिच्या घरी पोहोचल्यावर नरगिसने स्वत: दार उघडले. ती स्वयंपाकघरातून धावत आली, जिथे ती पकोडे तळत होती. चुकून तिने बेसनने भरलेले हाथ आपल्या केसांना लावले. ज्यामुळे बेसन तिच्या केसांना लागले. नर्गिसच्या या शैलीवर राज कपूर फिदा झाले होते.

विशेष म्हणजे पडद्यासोबतच वास्तविक जीवनात राज कपूर आणि नर्गिस दत्तची जोडी खूपच पसंत केली गेली. या दोघांची केमिस्ट्रीही उत्कृष्ट होती. दोघांनी एकत्र १६ चित्रपटांमध्ये काम केले आणि ही जोडी नऊ वर्षे हिट राहिली. दोघांच्या अफेअरची चर्चा सामान्य होती. लोकांचा वाटत होते की दोघांचेही लग्न होईल. पण या दोघांचे प्रेम कधीच पूर्ण होऊ शकले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER