विधानसभेचा अध्यक्ष काँग्रेसचाच असेल, नाना पटोले यांनी केले स्पष्ट

Nana Patole

मुंबई : काही आमदार – मंत्री करोना पॉझिटिव्ह असल्याने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेता येणार नाही. मात्र, हे पद काँग्रेसकडेच राहणार आहे. दरम्यान, करोनाची भीती कमी झाल्यास या अधिवेशनातही ही निवडणूक होऊ शकते, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणालेत.

काँग्रेसच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही अशा तक्रारी तुमच्या माध्यमातून माझ्या कानावर आल्या. पण त्या बाबतीत आम्ही जो काही ‘दम’ द्यायचा तो दिला आणि तो योग्य जागी पोहोचला याचे प्रत्यंतर तुम्हाला याच अधिवेशनात मिळेल, असे नाना पटोले म्हणाले.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी ते म्हणाले, भाजपाला घाई झाली आहे, त्यामुळे ते असे आरोप करत आहेत. पूजाचे कुटुंबीय सुद्धा ही गोष्ट मान्य करत नाही. त्यामुळे जो काही निर्णय आहे तो चौकशीनंतर शिवसेना पक्षप्रमुख घेतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER