वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांनी केली फडणवीसांची पाठराखण

Nana Patole-Devendra Fadnavis

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हिवाळी अधिवेशनात वाढीव वीज बिलांचा मुद्दा मांडत असताना सतारूढ पक्षाने गोंधळ घालणे सुरू केले. त्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी फडणवीस यांचे समर्थन केले.

सत्तारूढ पक्षाच्या आमदारांना बजावले, फडणवीस योग्य भूमिका मांडत आहेत. त्यानंतर फडणवीस यांनी याबाबतची बाजू मांडली. फडणवीस म्हणालेत, सरकारने वीज बिलासंबंधी घोषणा करून फसवणूक केली. वाढीव बिलांची रक्कम  कमी करा, अशी घोषणा करा, असे आम्ही नितीन राऊत यांना सांगितले नव्हते. वीज बिलाच्या सवलतीचे काय झाले? अशी विचारणा फडणवीसांनी केली. मुख्यमंत्री महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) विसंवाद नाही असे सांगतात; पण वीज बिलावरून काय संवाद आहे? प्रत्येक जण वेगळे वक्तव्य करत आहेत.

वापरलेल्या विजेचे बिल भरण्यासंबंधी माझे काही म्हणणे नाही. पण जी वीज वापरलीच नाही त्याचे बिल का भरणार? महाविकास आघाडीतील संवाद निर्णयात दिसू द्या. माझे तर सरळ म्हणणे आहे की, वीज बिलासंबंधी घोषणा करून सरकारने फसवणूक केली आहे, असे फडणवीस म्हणालेत. यावेळी गोंधळ सुरू झाला असता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणालेत, विरोधी पक्षनेते योग्य भूमिका मांडत आहेत.

महाराष्ट्रात सरासरी बिल देण्याची जी पद्धत आहे ती तातडीने  थांबवली पाहिजे. अन्यथा हे विषय सातत्याने येत राहतात. मीटर घरी नाही त्यालाही बिल जाते ! अशी ही पद्धत आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात या मुद्द्यावर वाद सुरू झाला. नाना पटोले म्हणालेत, ही पद्धत  या सरकारची नाही, अनेक वर्षांची परंपरा आहे. ही पद्धत बदलली पाहिजे हेच मला सांगायचे आहे. हे मागच्या काळात नव्हते असा काही भाग नाही. त्यामुळे हा राजकीय विषय नाही.

ही बातमी पण वाचा : रवी राणांच्या पोषाखावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले संतापले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER