दक्षिण कोरियाच्या या अ‍ॅक्शन डायरेक्टरने सलमान खानच्या राधे या चित्रपटासाठी डिझाइन केले फाइट सीक्वेन्स

Salman Khan-Radhe Movie

बॉलिवूड अभिनेता सलमान खान  (Salman Khan)आजकाल आपला नवीन चित्रपट राधेः योर मोस्ट वॉन्टेड भाई (Radhe: Your Most Wanted Bhai) या सिनेमासाठी चर्चेत आहे. या चित्रपटात सलमान खतरनाक अ‍ॅक्शन आणि स्टंट करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा अ‍ॅक्शन सीक्वेन्स दक्षिण कोरियाचा प्रसिद्ध स्टंटमॅन क्वोन ताए-हो ने डिझाइन केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Not Diwali 2020, Salman Khan's most awaited 'Radhe' to release next year, actor cancels shoot!एका न्यूज पोर्टलनुसार क्वान ताए-हो (Kwan Tae-ho) दक्षिण कोरियाचा सर्वात मोठा मार्शल आर्ट स्टार आणि स्टंटमॅन म्हणून ओळखला जातो. नोव्हेंबर २०१९ मध्ये तो मुंबईला आला आणि त्याने चित्रपटामधील सलमान खान आणि रणदीप हूडा यांच्यातील फाइट सीक्वेन्सची रचना केली.

अहवालात असे म्हटले आहे की, दिग्दर्शक प्रभु देवाला चित्रपटात सलमान खान आणि रणदीप हूडा यांच्यातील अ‍ॅक्शन सीन रोमँटिक करण्याची इच्छा होती, त्यासाठी त्याने क्वेन ताए-हो ची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण कोरियाहून आल्यानंतर तो एक महिना मुंबईत थांबला आणि त्याच्या निर्देशानुसार वांद्रे स्टुडिओमध्ये अ‍ॅक्शन सीन्स शूट करण्यात आले. असेही सांगितले जात आहे की, सलमान खान एका फाईट सीन मध्ये क्वेन ताए-होबरोबर फाईट करताना दिसणार आहे.

सांगण्यात येते की, राधे या चित्रपटात सलमान खान सोबत दिशा पाटनी दिसणार आहेत. या दोन तार्‍यांव्यतिरिक्त, जॅकी श्रॉफ देखील या चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा चित्रपट यंदा ईदवर प्रदर्शित होणार होता पण कोरोनामुळे शूटिंग वेळेवर पूर्ण होऊ शकली नाही. त्याची नवीन रिलीजची तारीख अद्याप उघड झाली नाही.

ही बातमी पण वाचा : ‘राधे’ चित्रपटाच्या सेटवर भावुक झाला सलमान खान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER